धुळेः गुंड गुड्ड्याच्या हत्याकांड प्रकरणी प्रमुख नऊ आरोपींसह चौदा अटकेत

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 29 जुलै 2017

धुळेः गुंड गुड्ड्याच्या हत्याकांड प्रकरणी जिल्हा पोलिस यंत्रणेने प्रमुख नऊ आरोपींसह एकूण चौदा जणांना अटक केली. यात प्रमुख आरोपी छोटा पापा ऊर्फ विलास श्‍याम गोयर आणि राजेश देवरे ऊर्फ भद्रा यांना इंदूर (मध्य प्रदेश) येथून आज (शनिवार) पहाटे ताब्यात घेण्यात पोलिसांनी यश मिळविले. हे दोघे प्रमुख आरोपी इंदूर येथे एकमेकांना भेटणार होते.

या कारवाईमुळे एकूण नऊ मारेकरी आणि पाच आश्रयदाते, अशा एकूण चौदा जणांना अटक झाली आहे. गुंड गुड्ड्याच्या पारोळा रोडवरील गोपाल टी हाऊस व समोर रस्त्यावर 18 जुलैला सकाळी सव्वासहाला झालेल्या क्रूर हत्याकांडानंतर विविध पथके आरोपींच्या मागावर होते.

मोठ्या कारवाईने ताण हलका
पोलिस यंत्रणा फरार प्रमुख आरोपी विकी ऊर्फ विकास श्‍याम गोयर, श्‍याम जोगीलाल गोयर, विजय श्‍याम गोयर ऊर्फ बडा पापा यांच्या शोधकार्यात जुटली आहे. तेही लवकर हाती लागतील, असा विश्‍वास पोलिस प्रशासनाने व्यक्त केला. शनिवारी पहाटेच्या मोठ्या आणि महत्त्वाच्या कारवाईमुळे पोलिस अधिकाऱ्यांच्या चेहऱ्यावरील ताण काहीसा कमी झाल्याचे दिसून आले. जिल्हा पोलिस अधीक्षक एम. रामकुमार, अपर पोलिस अधीक्षक विवेक पानसरे, तपास अधिकारी तथा पोलिस उपअधीक्षक हिंमतराव जाधव, "एलसीबी'चे पोलिस निरीक्षक रमेशसिंह परदेशी, देवपूरचे पोलिस निरीक्षक किशोर शिरसाट यांनी शनिवारी झालेल्या कारवाईची माहिती पत्रकारांना दिली.

नऊ आरोपींना अटक
पोलिसांनी आतापर्यंत प्रमुख मारेकरी सागर पवार ऊर्फ कट्टी, अभय ऊर्फ दादू देवरे, पारस घारू, छोटा पापा ऊर्फ विलास गोयर आणि राजेश देवरे ऊर्फ राजा भद्रा, भीमा देवरे (धुळे), गणेश बिवाल (खंडवा, मध्य प्रदेश), योगेश जगताप (पुणे), विक्की चावरे (दौंड) यांना अटक केली आहे.

आसरा देणारे पाच अटकेत
मारेकऱ्यांना आसरा देणारे संशयित योगेश जयस्वाल (धुळे), प्रकाश मोरे (उल्हासनगर), महेंद्र खैरनार (कासारे, ता. साक्री), राकेश सोनार (नाशिक), लखन जेधे (संगमनेर, जि. नगर) यांना अटक झाली आहे. पोलिस यंत्रणेने तपासातील अनेक अडचणींवर मात करत ही यशस्वी कामगिरी केली. पोलिस अधीक्षक एम. रामकुमार, अप्पर पोलिस अधीक्षक विवेक पानसरे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे. गुन्ह्यातील आरोपींची संख्या 25 हून अधिक होण्याची शक्‍यता आहे. गुंड गुड्ड्याच्या हत्याकांडाचे मूळ कारण मारेकऱ्यांच्या चौकशीअंतीच स्पष्ट होईल. त्यादृष्टीने तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. गुड्ड्या हत्याकांडाचा तपास मुंबई क्राईम ब्रॅंचकडे सोपविला जाणार आहे किंवा नाही, याविषयी काहीही माहिती नसून त्यासंबंधी कुठलाही आदेश अद्याप प्राप्त नसल्याचे श्री. पानसरे यांनी सांगितले.

ई सकाळवरील ताज्या बातम्यांसाठी क्लिक करा:

Web Title: dhule news guddya murder case 14 areested