प्राप्तिकर विभाग काँग्रेस आघाडीचे नेते, कंपनी भागीदारांच्या घरी

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 17 जानेवारी 2018

धुळेः प्राप्तिकर विभागाच्या पथकाने आज (बुधवारी) पहाटे पाचपासून शिरपूर येथे काँग्रेसचे नेते, माजी शिक्षण मंत्री, विधान परिषदेचे आमदार अमरिशभाई पटेल, धुळे शहरात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, माजी आमदार राजवर्धन कदमबांडे यांच्या निवासस्थानी तपासणी सुरू केली. ती दुपारी दोननंतरही सुरू होती. तसेच पटेल, कदमबांडे यांच्यासह त्यांच्या वस्त्रोद्योग कंपन्यांमध्ये भागीदार असलेले काही संचालक, काँग्रेसच्या अन्य काही नेत्यांच्या घरीही तपासणी सुरू आहे. यासंदर्भात उलटसुलट चर्चांनी राजकीय वातावरण ढवळून निघते आहे.

प्राप्तिकर विभागाची ही नियमित तपासणी असल्याचा दावा पटेल, कदमबांडे समर्थकांकडून केला जात आहे, तर त्यांचे विरोधक हा छापा असल्याचा दावा करत आहे. यामुळे पटेल, कदमबांडे व अन्य काही समर्थक नेते, पदाधिकाऱ्यांच्या घरी छापेमारीचे सत्र, असा संदेशही सोशल मीडियावर व्हायरल केला जात आहे. पटेल, कदमबांडे व समर्थक काही नेते, प्रमुख राजकीय पदाधिकारी वस्त्रोद्योग कंपन्यांमध्ये भागीदार आहेत. शिरपूर येथे तीन ते चार कंपन्या असून त्या निर्यातक्षम आहेत. तसेच धुळे शहरालगत "एमआयडीसी'मध्ये आणखी एक वस्त्रोद्योग प्रकल्प उभारण्याचा प्रयत्न पटेल, कदमबांडे यांच्यांकडून सुरू आहे. त्या संदर्भात शासकीय सोपस्कार पार पाडले जात आहे. असे असताना त्यांच्या काही विरोधकांकडून या मुद्याचे राजकीय भांडवल केले जात आहे. एकीकडे हा मुद्दा जिल्ह्यात चर्चेत असताना प्राप्तिकर विभागाच्या तीन जिल्ह्यांमधील पथकांनी पटेल, कदमबांडे, कंपनीचे भागीदार असलेले अन्य काही नेते, प्रमुख राजकीय पदाधिकारी संचालकांच्या घरी तपासणी सुरू केल्याने उलटसुलट चर्चेला उधाण आले.

Web Title: dhule news Income Tax Department raid politicians home