निजामपूर-जैताणेत स्वातंत्र्य दिन उत्साहात

jaitane
jaitane

निजामपूर-जैताणे (धुळे) : माळमाथा परिसरातील जैताणे(ता.साक्री) ग्रामपंचायतीत सरपंच संजय खैरनार यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सामाजिक कार्यकर्ते बारीक पगारे होते. त्यांनतर आदर्श विद्या मंदिराचे शिक्षक शालिग्राम भदाणे व सौ. शीला भदाणे यांची पोलीस उपनिरीक्षकपदी निवड झालेली दोन्ही मुले तुषार भदाणे, राहुल भदाणे, मुलगी पूजा भदाणे-आखाडे यांचा व गावातील धनगर समाजाचे कार्यकर्ते विश्राम शिरोळे व त्यांचा पोलीस उपनिरीक्षक मुलगा अनिल शिरोळे यांचाही जैताणे ग्रामपंचायतीतर्फे सत्कार करण्यात आला. यावेळी उपसरपंच आबा भलकारे, ग्रामविकास अधिकारी योगेंद्र सोनवणे, लिपिक यादव भदाणे आदींसह ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते.

निजामपूर ग्रामपंचायतीत सरपंच साधना राणे यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. यावेळी उपसरपंच रजनी वाणी, ग्रामविकास अधिकारी श्री.पवार माजी सरपंच अजितचंद्र शाह आदींसह सर्व ग्रामपंचायत सदस्य, कर्मचारी व ग्रामस्थ उपस्थित होते. त्यांनतर आझाद चौकातील मुख्य ध्वजारोहण सामाजिक कार्यकर्ते रमेश वाणी यांच्या हस्ते झाले. यावेळी जिल्हा परिषद सदस्या उषा ठाकरे, पंचायत समिती सदस्य वासुदेव बदामे आदींसह ग्रामपंचायतीचे पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.

निजामपूर येथील जवाहरलाल वाचनालयात माजी सरपंच व सामाजिक कार्यकर्ते अरुण वाणी यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. यावेळी वाचनालयाचे अध्यक्ष नयनकुमार शाह, सचिव नितीन शाह आदींसह संचालक, कर्मचारी व ग्रामस्थ उपस्थित होते. त्यांनतर येथील आदर्श विद्या मंदिर व कनिष्ठ महाविद्यालयात मुख्याध्यापक जयंत भामरे यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. यावेळी संस्थेचे सचिव नितीन शाह, संचालक बारीक पगारे, राजेंद्र वाणी, राघो पगारे, उपमुख्याध्यापक राजेंद्र चौधरी, पर्यवेक्षक राजेंद्र जाधव, सुरेश माळी, माजी मुख्याध्यापक मनोहर भावसार, डी. बी. वाणी वरीष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अशोक खैरनार आदींसह शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते. यावेळी इयत्ता पाचवी ते बारावीच्या विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. एनसीसीच्या विद्यार्थ्यांनी पथसंचलन केले.

आदर्श प्राथमिक विद्या मंदिर व आदर्श इंग्लिश मिडीयम स्कुलमध्ये मुख्याध्यापिका छाया अहिरे व चंद्रकांत शिंपी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी चिमुरड्यांनी विविध सांस्कृतिक कलागुण सादर केले. कार्यक्रमास शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी व पालक आदी उपस्थित होते.

जैताणे(ता.साक्री) येथील जिल्हा परिषद मराठी मुलांच्या शाळेत ग्रामपंचायत सदस्य नवल खैरनार यांच्या हस्ते तर मुलींच्या शाळेत ग्रामपंचायत सदस्या सुरेखा भिल यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. यावेळी ग्रामशिक्षण समितीच्या अध्यक्षा मनीषा बागुल, सामाजिक कार्यकर्ते परशराम खलाणे, प्रकाश गवळे, शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षकवृंद व ग्रामस्थ आदी उपस्थित होते.

निजामपूर येथील भानुबेन वाणी पब्लिक स्कुल व आशुमतिबेन शाह विद्यालयात संस्थेचे संचालक राजेंद्र राणे यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. यावेळी संचालक मंडळ व मुख्याध्यापक एम.एम.शिंदे, मनोज भागवत आदींसह शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी विविध कलागुणांचे सादरीकरण केले. येथीलच इंदिरा गांधी कन्या शाळेत सामाजिक कार्यकर्ते डॉ. रमाकांत शिरोडे यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. यावेळी मुख्याध्यापक ए. एस. अहिरराव, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी आदी उपस्थित होते. दरम्यान नववी-दहावीच्या विद्यार्थिनींमध्ये खो-खो ची स्पर्धा व दहीहंडीचा कार्यक्रमही आयोजित करण्यात आला होता.

जैताणे(ता.साक्री) येथील महात्मा फुले विद्यालयात जिल्हा परिषद सदस्या उषाबाई ठाकरेंच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी मुख्याध्यापक डी. डी. वाघ यांच्यासह शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. येथीलच रामराव दादा पाटील प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळेत निजामपूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक दिलीप खेडकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक सतीश नांद्रे, माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक गुलाबराव दाभाडे आदींसह शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com