निजामपूरला घेण्यात आली आंतरशालेय वादविवाद स्पर्धा

निजामपूरला घेण्यात आली आंतरशालेय वादविवाद स्पर्धा
निजामपूरला घेण्यात आली आंतरशालेय वादविवाद स्पर्धा

निजामपूर-जैताणे (साक्री-धुळे) : निजामपूर-जैताणे ग्रामविकास प्रतिष्ठान संचलित भानुबेन वाणी पब्लिक स्कुलमध्ये शनिवारी (ता.18) इंग्रजी भाषेतून तीन गटात वादविवाद स्पर्धा घेण्यात आली. यामध्ये श्रुती उमाकांत घरटे (पिंपळनेर), अभिजित हेमंत देसले (निजामपूर) व पल्लवी धनंजय वाघ (निजामपूर) यांनी अनुक्रमे तिन्ही गटातून प्रथम क्रमांक पटकावला.

या जिल्हास्तरीय आंतरशालेय वादविवाद स्पर्धेत निजामपूरसह पिंपळनेर, साक्री, दहीवेल व इंदवे येथील इंग्रजी माध्यमाच्या शाळेतील चौथी ते दहावीच्या विद्यार्थ्यांचे संघ सहभागी झाले होते. नववी-दहावीचा 'अ' गट, सातवी-आठवीचा 'ब' गट, तर चौथी ते सहावीचा 'क' गट होता. स्पर्धेत एकूण 22 स्पर्धक सहभागी झाले होते.

स्पर्धेसाठी अनुक्रमे 'अ' गटासाठी "पाणी, झाडे, वने व वन्यजीव वाचवाल तर वाचाल," 'ब' गटासाठी "राष्ट्र व विद्यार्थ्यांच्या विकासात संस्कारांचे महत्व", तर 'क' गटासाठी "कर्तृत्ववान, संयमी आणि बुद्धिमान शिक्षकच घडवू शकतात मेरा भारत महान", "सुरक्षित, सुसंस्कारी शाळा हव्यात आम्हाला," व "स्वच्छता हीच सेवा, मिळवा आरोग्याचा मेवा" असे वैविध्यपूर्ण विषय होते. स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्रासह अनुक्रमे एकवीसशे, पंधराशे व अकराशे रुपयांचे रोख पारितोषिक होते. तर विजयी संघास फिरता चषक असे बक्षिसांचे स्वरूप होते.

'अ' गटातून पिंपळनेरच्या श्रीमती डी.जी. अग्रवाल मेमोरियल स्कुलची श्रुती उमाकांत घरटे (प्रथम) व फाल्गुनी रामचंद्र तोलानी (द्वितीय), तर साक्रीच्या फिलियास झेनिथ इंटरनॅशनल स्कुलचा आफताब सईद पटेल (तृतीय),
'ब' गटातून निजामपूरच्या भानुबेन वाणी पब्लिक स्कुलचा अभिजित हेमंत देसले (प्रथम), पिंपळनेरच्या श्रीमती डी.जी. अग्रवाल मेमोरियल स्कुलची सानिका जितेंद्र कोतकर (द्वितीय), पिंपळनेर येथीलच आ. मा. पाटील इंग्लिश मिडीयम स्कुलची हर्षदा किशोर मोरे (तृतीय), तर दहीवेलच्या डी.एस.पाटील इंग्लिश मिडीयम स्कुलचा दिकेत संतोष चव्हाण (उत्तेजनार्थ),
'क' गटातून निजामपूरच्या भानुबेन पब्लिक स्कुलची पल्लवी धनंजय वाघ (प्रथम), पिंपळनेरच्या श्रीमती डी. जी. मेमोरियल स्कुलचा संकेत विवेकानंद शिंदे (द्वितीय), तर इंदवे येथील पी. के. सोनवणे होली फेथ इंटरनॅशनल स्कुलचा मयूर बापू पदमोर हा (तृतीय) आला.
प्राचार्य मदनमोहन शिंदे (निजामपूर) व श्रीमती मुरलीधरन (पिंपळनेर) यांनी स्पर्धेचे परीक्षण केले.

मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक वितरण..
दरम्यान संस्थेचे अध्यक्ष प्रमोदचंद्र शाह, सचिव लक्ष्मीकांत शाह, संचालक मोहन सूर्यवंशी, प्राचार्य मदनमोहन शिंदे, मुख्याध्यापक मनोज भागवत, श्रीमती मुरलीधरन, सामाजिक कार्यकर्ते रघुवीर खारकर, खुदाबक्ष शेख, प्रा.भगवान जगदाळे, मुख्याध्यापक मनोज भागवत आदींच्या हस्ते विजेत्यांना पारितोषिक वितरण करण्यात आले. संस्थाध्यक्ष प्रमोदचंद्र शाह कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. यावेळी लक्ष्मीकांत शाह, प्राचार्य मदन शिंदे, श्रीमती मुरलीधरन, रघुवीर खारकर, प्रा. भगवान जगदाळे आदींनी मनोगत व्यक्त केले. मुख्याध्यापक मनोज भागवत यांनी प्रास्ताविक केले. शिक्षिका योगिता कोळी यांनी सूत्रसंचालन केले. तर शिक्षक घनश्यामभाई परमार यांनी आभार मानले. यावेळी निजामपूर, साक्री, पिंपळनेर, दहीवेल व इंदवे येथील इंग्रजी माध्यमाच्या शाळांचे विद्यार्थी व शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते. भानुबेन वाणी पब्लिक स्कुलच्या शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विशेष परिश्रम घेतले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com