निजामपूर-जैताणेत 'अंनिस'तर्फे 'जवाब दो' आंदोलन

प्रा. भगवान जगदाळे
सोमवार, 21 ऑगस्ट 2017

कॉ. गोविंद पानसरे व कर्नाटक राज्याचे विवेकवादी विचारवंत प्रा. एम. एम कलबुर्गी यांच्या हत्येलाही अनुक्रमे अडीच व दीड वर्षे पूर्ण झालीत. परंतु त्यांचे मारेकरी अद्यापही मोकाटच आहेत. त्यांच्या मारेकऱ्यांचा त्वरित शोध घेऊन त्यांच्या हत्येची सखोल चौकशी करावी व गुन्हेगारांना कठोर शिक्षा करावी.

निजामपूर-जैताणे (साक्री-धुळे) : विवेकवादी विचारवंत डॉ.नरेंद्र दाभोळकर यांच्या हत्येला 4 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या निजामपूर-जैताणे शाखेतर्फे आज "जवाब दो" आंदोलन करण्यात आले.

तसेच कॉ. गोविंद पानसरे व कर्नाटक राज्याचे विवेकवादी विचारवंत प्रा. एम. एम कलबुर्गी यांच्या हत्येलाही अनुक्रमे अडीच व दीड वर्षे पूर्ण झालीत. परंतु त्यांचे मारेकरी अद्यापही मोकाटच आहेत. त्यांच्या मारेकऱ्यांचा त्वरित शोध घेऊन त्यांच्या हत्येची सखोल चौकशी करावी व गुन्हेगारांना कठोर शिक्षा करावी. अशा आशयाचे निवेदन आज शाखाध्यक्ष डॉ. रमाकांत शिरोडे, कार्याध्यक्ष प्रा. भगवान जगदाळे, बुवाबाजी संघर्ष कार्यवाह रमेश वाणी, प्रसिद्धी प्रमुख रघुवीर खारकर, प्रशिक्षण कार्यवाह सुनील शाह, डॉ. हरिभाऊ ठाकरे आदींच्या हस्ते ठाणे अंमलदार योगेश शिरसाठ यांना देण्यात आले.

यावेळी पोलीस नाईक प्रकाश लोहार, वामन चौधरी, अमीन पिंजारी व राकेश पाटील आदी कर्मचारी उपस्थित होते. यावेळी पोलिसांनी 'अंनिस'च्या कार्यकर्त्यांचे म्हणणे वरिष्ठांसह शासनापर्यंत पोचविण्याचे सकारात्मक आश्वासन दिले...

Web Title: Dhule news jawab do agitation in jaitane