खानदेशात आजपासून कानबाई उत्सवाची धूम...!

जगन्नाथ पाटील
शनिवार, 29 जुलै 2017

रोट कसे करतात...
एकत्र कुटुंब असेल तर रोटांसाठी घरातील लहान मोठ्या पुरुषांना मोजुन प्रत्येकाची सव्वा मुठ असे धान्य म्हणजे गहु, चण्याची दाळ घेतले जाते. ते जात्यावरच दळले जातात. त्यासाठी रात्रभर गाणे गात जागरण केले जाते. पुरण पोळी, खीर कटाची आमटी चण्याची दाळ घालुन, गंगाफळ/ लाल भोपळ्याची भाजी असा थाट असतो. कांदा लसूण वर्ज्य. साड्यांचे पडदे लावुन डेकोरेशन केले जाते. कानबाईचे नारळ मुख्यतः पुर्वापार चालत आलेले असते किंवा परनुन आणलेले असते.

धुळे : सध्या खानदेशात कानबाई उत्सव साजरी करण्याची लगीनघाई सुरु आहे. श्रावणातल्या नागपंचमीनंतरच्या पहिल्या रविवारी कानबाई किंवा कानुबाई हा उत्सव खान्देशात उत्साहाने साजरा केला जातो. त्यासाठी तिथी वगैरे बघत नाही. कानबाई उत्सवाला फार जुनी परंपरा लाभली आहे. हा उत्सव सर्वच समाजात साजरा केला जातो. भाऊबंदकितील जी मंडळी नोकरी व्यवसायाने लांबवर गेलेली असतात. तेही या तीन दिवसांसाठी गावाकडे येवू लागली आहेत. उत्सवाची तयारी सुरु झाली आहे. या उत्सवालाच कानबाईना रोट असे म्हटले जाते.

उत्सवाच्या आधीही दिवाळ सणाच्या आधी करतो तशी तयारी केली जात आहे. घरातील भांडी घासुन पुसुन स्वच्छ केली जात आहेत. पडदे, चादरी, बेडशीट्स, कव्हर्स सगळे धुतली जात आहे. यासाठी महिलांची लगीनघाई सुरु आहे.

रोट कसे करतात...
एकत्र कुटुंब असेल तर रोटांसाठी घरातील लहान मोठ्या पुरुषांना मोजुन प्रत्येकाची सव्वा मुठ असे धान्य म्हणजे गहु, चण्याची दाळ घेतले जाते. ते जात्यावरच दळले जातात. त्यासाठी रात्रभर गाणे गात जागरण केले जाते. पुरण पोळी, खीर कटाची आमटी चण्याची दाळ घालुन, गंगाफळ/ लाल भोपळ्याची भाजी असा थाट असतो. कांदा लसूण वर्ज्य. साड्यांचे पडदे लावुन डेकोरेशन केले जाते. कानबाईचे नारळ मुख्यतः पुर्वापार चालत आलेले असते किंवा परनुन आणलेले असते.

'कानबाई परनुन आणणे'
पुर्वीच्या काळी एखाद्या खेड्यात ठरवुन गावचे पाटील लोक गावोगावी आमंत्रण पाठवायचे. ज्या घरातल्या बाईला काही कापलेलं, भाजलेलं नाही. अशा सवाष्णी निवडल्या जायच्या. सासरी असल्यातरी सासरकडचे लोक घेउन यायचे. तेव्हा गावात उत्सव व्हायचा. त्या स्रीयांना नाना वस्त्र अलंकारांनी सजवुन त्यांची पुजा करायचे. गावची गावं जेवायला असायची. टनाने पुरणपोळ्या रांधल्या जायच्या. अक्षरशः बैलगाड्यांवर स्वच्छ धुतलेली धोतरं अंथरुन शिजवलेला भात लादला जायचा. हा सगळा स्वैपाक,नदीवरुन पाणी आणण्यापासुन पुरुषमंडळी करायची. तिथे त्या सवाष्णींनी स्पर्श केलेला नारळ घेउन तोच वर्षानुवर्षे पुजेत वापरला जायचा. हे परनुन आणलेले नारळ त्या दिवशी धुवुन घेतात त्यालाच नथ, डोळे, बसवुन इतरही पारंपारीक दागिने घालतात.केळीचे व कण्हेरीचे खांब बांधलेल्या चौरंगावर तांब्याचा कलश ठेउन तिची स्थापना होते. कण्हेरीला खान्देशात फार महत्व आहे. काही गाण्यांमधे कण्हेरीलाच कानबाई संबोधलं जातं.कलशावरुनच गळ्यातले हार, मणी मंगळसुत्र चढवले जाते. वरुन शेवंतीची वेणी लावुन ओढणी लावली जाते. मग आरती, नैवेद्य दाखवतात. नैवेद्याला अर्थातच पुरणपोळ्या, पुरणाचेच दिवे, देवीचा सगळा साज म्हणजे भंडारा, वेणी, फणी, आरसा, बांगड्या, टिकली, पोळपाट लाटणे, तवा हे सगळं कणकेचच केलं जातं  काही जणांकडे फक्त रोट असतात. मग ते रोट परातीत घेउन कानबाईच्या दर्शनाला येतात. या दिवशी कुणी कानबाईला काही मानता किंवा नवस केला असेल तर तो फेडण्यासाठीही गर्दी होते. मुख्यतः नारळाच्या तोरणाचा नवस असतो.

Web Title: Dhule news kanbai festival