धुळे शहरात 'बंद'ला हिंसक वळण

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 3 जानेवारी 2018

आग्रा रोड, साक्री रोडला दगडफेक, शिरपूरला तीन बस फोडल्या

धुळे: कोरेगाव भीमाच्या घटनेच्या निषेधार्थ संविधान संरक्षण समितीतर्फे पुकारण्यात आलेल्या आजच्या "बंद'ला हिंसक वळण लागले. धुळे शहरात आग्रा रोड, साक्री रोड परिसरात दुकानांवर दगडफेक करण्यात आली. शिरपूर येथे आगारात उभ्या असलेल्या दोन बसवर दगडफेक केली. समितीतर्फे पाचकंदील येथून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.

दरम्यान, दोंडाईचा, शिंदखेडा, साक्री, देवभाने फाटा, म्हसदीसह काही ठिकाणी शांततेत निदर्शने, रास्ता रोको करण्यात आला. पोलिसांनी जादा कुमक तैनात केली असून, नागरिकांना शांततेचे आवाहन केले आहे. परिवहन महामंडळानेही बस सोडणे सकाळी अकरालाच बंद केले होते.

कोरेगाव भीमाच्या घटनेचे पडसाद काल उमटून शहरात तणावपूर्ण वातावरण होते. रस्ते जवळजवळ निर्मनुष्यच होते. एकही पालकांनी मुलांना शाळेत न पाठविल्याने शाळांमध्येही शुकशुकाटच होता. त्यापार्श्‍वभूमीवर पाळण्यात आलेल्या बंदला आज शहरासह जिल्ह्यात काही ठिकाणी हिंसक वळण लागले. संविधान संरक्षण समितीतर्फे सर्व दलित समाजबांधव येथील आंबेडकर पुतळ्याजवळ जमत घटनेचा निषेध करण्यात आला. त्यानंतर तेथून मोर्चाने जात पाचकंदीलमार्गे आग्रा रोडने तो जिल्हाधिकारी कार्यालयावर आला. तत्पूर्वी साक्री रस्त्यावरील व्यापारी प्रतिष्ठानांवर दगडफेक करण्यात आली. आग्रा रोडवरही घोषणा देत आलेल्या जमावाने बंद असलेल्या दुकानांवर दगडफेक केली. चाळीसगाव रस्त्यावर काही ठिकाणी वाहनांवर दगडफेक करण्यात आली.

शिरपूर आगारात उभ्या असलेल्या बसवर बाहेरून मोटारसायकलने आलेल्या तरुणांच्या टोळक्‍याने पिशवीतून आणलेल्या दगडगोट्यांचा मारा केला. यात तीन बसचे नुकसान झाले आहे. शिरपूर- शहादा ही बस शहाद्याकडे निघाली असताना मांडळ रस्त्यावर झालेल्या दगडफेकीत चालक जखमी झाले आहेत. साक्री येथे गावातून रॅली काढत शांततेत मोर्चा काढत बंद पाळण्यात येत आहे. तेथे कोणताही अनुचित प्रकार घडलेला नाही. कापडणे येथे महामार्गावर रास्ता रोको करण्यात आल्याने वाहनांच्या लांबचलांब रांगा लागल्या होत्या. दरम्यान, पोलिसांसह प्रशासनाने नागरिकांना शांततेचे आवाहन केले आहे.

Web Title: dhule news koregaon bhima and dhule band