धुळे : वासखेडीत दारूबंदीसाठी विद्यार्थी व महिलांचा एल्गार

प्रा. भगवान जगदाळे
शनिवार, 8 जुलै 2017

"मी नुकताच निजामपूर पोलीस ठाण्याच्या सहाय्यक पोलीस निरीक्षकपदी कार्यभार स्वीकारला आहे. त्यामुळे येथून पुढे माझ्या कार्यकाळात अवैध धंदे व अवैध दारूविक्री करणाऱ्यांवर अधिक कठोर कारवाई केली जाईल. त्याबाबतीत कोणाचीही गय केली जाणार नाही."
-राहुल पवार,  सहायक पोलीस निरीक्षक, पोलिस स्टेशन,निजामपूर

निजामपूर - माळमाथा परिसरातील वासखेडी(ता.साक्री) येथील महिला व शालेय विद्यार्थ्यांनी दारूबंदीसाठी एल्गार पुकारला असून ग्रामपंचायत सदस्य व सामाजिक कार्यकर्ते नंदूआबा नेरकर यांच्या नेतृत्वाखाली नुकताच ग्रामपंचायत कार्यालयापासून गावातील विद्यार्थी-विद्यार्थिनी, शिक्षक कर्मचारी, महिला व ग्रामस्थांसह गावातून भव्य रॅली व मोर्चा काढण्यात आला. त्यात शेकडोंच्या संख्येने गावकरी सहभागी झाले होते.

सद्या वासखेडी गावासह परिसरात दारू, जुगार आदी अवैध धंदे मोठया प्रमाणात सुरू असून पोलिसांचा त्यांच्यावर वचक राहिलेला नाही. गावात मोठ्या प्रमाणावर अवैध दारूविक्री होत असल्याने गावातील तरुणाई व अल्पवयीन मुले मोठया प्रमाणावर व्यसनाधीन झाली आहेत. महिला व विद्यार्थ्यांना त्याचा मोठ्या प्रमाणावर फटका बसतो. गावातील 35 ते 40 टक्के घरांमध्ये दररोज सायंकाळी पती-पत्नी, आई-वडील व मुलगा यांच्यात भांडणे होतात. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या मनावरही त्याचा खोलवर परिणाम होतो व अभ्यासाच्या वेळेतच कौटुंबिक कलह सुरू होतो.

अनेकदा पोलिसांकडे तक्रार देऊनही त्याचा उपयोग होत नाही. त्यामुळे गावाचे भविष्य धोक्यात आले आहे. असा आरोप पत्रकाद्वारे सामाजिक कार्यकर्ते नंदू नेरकर यांच्यासह महिला व ग्रामस्थांनी केला आहे. यावेळी वासखेडी ग्रामपंचायतीलाही दारुबंदीबाबतचा ठराव मंजूर करण्यासाठी साकडे घालण्यात आले. तसेच निजामपूर पोलीस ठाण्यात दारूबंदीसह अवैध धंदे बंद करण्याबाबत निवेदन देण्यात आले.

"मी नुकताच निजामपूर पोलीस ठाण्याच्या सहाय्यक पोलीस निरीक्षकपदी कार्यभार स्वीकारला आहे. त्यामुळे येथून पुढे माझ्या कार्यकाळात अवैध धंदे व अवैध दारूविक्री करणाऱ्यांवर अधिक कठोर कारवाई केली जाईल. त्याबाबतीत कोणाचीही गय केली जाणार नाही."
-राहुल पवार,  सहायक पोलीस निरीक्षक, पोलिस स्टेशन,निजामपूर

ई सकाळवरील ताज्या बातम्यांसाठी क्लिक करा -
सिंधुदुर्ग जिल्ह्यात आढळली पाच फूटांची मगर
कोणी न्याय देता का न्याय', वृद्ध दांपत्याची आर्त हाक​
गोंदिया: गोरेगाव तालुक्‍यातील 17 गावात महिलांना मिळणार सरपंच होण्याची संधी​
तरुणाईच्या कंडिशन्स (नवा चित्रपट : कंडिशन्स अप्लाय...अटी लागू )​
नात्यांचं भावनिक हृदयांतर (नवा  चित्रपट : हृदयांतर )​
दक्षिण आफ्रिकेविरुद्ध वर्चस्वाचा भारतीय महिलांचा पूर्ण निर्धार​
नाशिक सायकलिस्ट फाऊंडेशनचे अध्यक्ष जसपालसिंग बिरदी यांचे निधन​
शिक्षकांच्या दुर्लक्षामुळे सहा वर्षाचा विद्यार्थी शाळेतील वर्गखोलीत तीन तास बंद​
तब्बल 42 वर्षानंतर भारताला सुवर्ण​

Web Title: Dhule news liquor ban in vaskhedi