धुळे : कर्मचाऱ्यांची वाट पाहता स्वच्छता करण्याचा तरुणांचा निर्धार!

जगन्नाथ पाटील
शुक्रवार, 23 जून 2017

कापडणे (धुळे) - तुंबलेल्या गटारी, वाढती दुर्गंधी आणि अस्वच्छता. ग्रामपंचायतीकडे असलेली कर्मचाऱ्यांची वाणवा. काही ग्रामपंचायत सदस्यांचे वॉर्डाकडे असलेले दुर्लक्ष या सर्व समस्यांवर मात करण्यासाठी येथील स्थानिक तरुणांनी विधायक विचार करून स्वत:च पुढाकार घेत महिन्यातून एकदा गटारांची साफसफाई करत आहेत.

कापडणे (धुळे) - तुंबलेल्या गटारी, वाढती दुर्गंधी आणि अस्वच्छता. ग्रामपंचायतीकडे असलेली कर्मचाऱ्यांची वाणवा. काही ग्रामपंचायत सदस्यांचे वॉर्डाकडे असलेले दुर्लक्ष या सर्व समस्यांवर मात करण्यासाठी येथील स्थानिक तरुणांनी विधायक विचार करून स्वत:च पुढाकार घेत महिन्यातून एकदा गटारांची साफसफाई करत आहेत.

शहरातील प्रभाग क्रमांक चारमधील तरुणांनी अस्वच्छतेच्या समस्येवर उपाय शोधला आहे. त्यांच्या वॉर्डात गटारी तुंबलेल्या, वाढती वाढणारी दुर्गंधी आणि अस्वच्छता होती. ग्रामपंचायतीकडे कर्मचाऱ्यांची वाणवा आहे. तर काही कर्मचाऱ्यांचा कामचुकारपणाही दिसून येतो. काही ग्रामपंचायत सदस्यांचे वॉर्डाकडे असलेले पूर्णतः दुर्लक्ष. त्यांनी दिलेले "वॉर्डाला स्वच्छ आणि सुंदर करु' असे आश्वासनही ते विसरले आहेत. अशा स्थितीत ग्रामस्थांना नेमके काय करायचे असा प्रश्‍न पडला. यावर प्रभागातील तरुणांनीच उपाय शोधला. पंचायतीकडे हेलपाटे मारायचे नाहीत. स्वतः महिन्यातून एकदा गटारींची साफसफाई करायची, असे ठरले. अन त्या कामाला त्यांनी सुरुवातही केली आहे. या विधायक उपक्रमाचे परिसरात सर्वत्र कौतुक होत आहे.

गेल्या दोन महिन्यांपाहून गावातील सरपंचाचे पद अस्थिर होते. त्यातच ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचा ऑनड्युटी अपघाती मृत्यू होणे, ग्रामविकास अधिकारी रजेवर असणे आदी कारणांमुळे विकास कामे रेंगाळली आहेत. ठिकठिकाणी गटारींची साफसफाई न झाल्याने गटारी तुंबल्या आहेत. नूतन सरपंच स्वच्छतेच्या बाबतीत जागरुक आहेत. सध्या त्यांचेही दुर्लक्ष होत असल्याचे बोलले जात आहे. त्यांनी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर जलद गतीने तुंबलेल्या गटारींची स्वच्छता करणे गरजेचे आहे. अधिक मनुष्यबळ वापरुन युध्द पातळीवर स्वच्छता करण्याची मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.

युवकांची विधायकता
प्रभाग चारमधील तरुणांनी पंचायतीकडे हेलपाटे मारायचे बंद केले आहेत. स्वतः महिन्यातून एकदा गटारींची साफसफाई करण्याचा निर्धार केला आहे. स्वच्छतेच्या कामाला त्यांनी सुरुवातही केली आहे. यात अमोल बोरसे, दत्तात्रेय पाटील, ललित पाटील, स्वराज पाटील, संत गाडगेबाबा स्वच्छता समितीचे अध्यक्ष जितेंद्र पाटील, ग्रामपंचायत सदस्य अमोल पाटील, गुलाब पाटील, बबलू खंबाळेकर, बंटी पाटील या तरुणांनी सुरुवात केली आहे. विधायक उपक्रमाचे ग्रामस्थांकडून समाधान व्यक्त होत आहे.

Web Title: dhule news marathi news grampanchayat swachata