हुतात्मा जवान मिलिंद खैरनार यांना मानवंदना...

प्रा. भगवान जगदाळे
गुरुवार, 12 ऑक्टोबर 2017

निजामपूर-जैताणे (साक्री-धुळे): माळमाथा परिसरातील निजामपूर-जैताणे (ता. साक्री) येथील ग्रामस्थ व ज्या आदर्श विद्या मंदिरात हुतात्मा जवान मिलिंद खैरनार यांचे पाचवीपर्यंत शिक्षण झाले होते. त्या आदर्श शाळेचे संचालक मंडळ, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांतर्फे हुतात्मा मिलिंद खैरनार यांना मानवंदना देण्यात आली. नाशिक येथून नंदुरबारकडे हुतात्मा मिलिंद खैरनार यांचे पार्थिव नेत असताना रस्त्याच्या दुतर्फा थांबून विद्यार्थ्यांनी "हुतात्मा मिलिंद खैरनार अमर रहे", 'वंदे मातरम', 'भारत माता की जय', 'पाकिस्तान मुर्दाबाद' अशा जोरदार घोषणा दिल्या.

दोन्ही गावांच्या ग्रामपंचायतींसह, सरपंच संजय खैरनार, आदर्श विद्या मंदिराचे शालेय समिती अध्यक्ष अजितचंद्र शाह, सचिव नितीन शाह, संचालक राजेंद्र वाणी, मुख्याध्यापक जयंत भामरे, प्रा. डॉ. रवींद्र ठाकरे, शिवसेनेचे प्रकाश पाटील आदींसह आदर्श विद्या मंदिराचे संचालक मंडळ, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी, महात्मा फुले विद्यालयाचे विद्यार्थी व शिक्षक कर्मचारी, समस्त शिंपी समाज, सर्वपक्षीय स्थानिक नेते, जैताणे 33-KV वीज उपकेंद्राचे शाखा अभियंता व वीज कर्मचाऱ्यांनी घटनेबाबत शोक व्यक्त केला. तसेच या घटनेचा तीव्र शब्दात निषेधही केला. सरपंच संजय खैरनार यांनी बसस्थानकावर जैताणे ग्रामपंचायतीतर्फे हुतात्मा मिलिंद खैरनार यांना तिरंगा ध्वज अर्पण केला. त्यांनतर आदर्श विद्या मंदिरात झालेल्या शोकसभेत हुतात्मा जवानाला सामूहिक श्रद्धांजली वाहण्यात आली.

"हुतात्मा वीर जवान मिलिंद खैरनार यांचे पाचवीपर्यंतचे शिक्षण निजामपूर-जैताणे (ता. साक्री) येथील आदर्श विद्या मंदिरात झालेले आहे. त्यांचे वडील श्री. किशोर खैरनार हे जैताणे येथील 33-KV वीज उपकेंद्रात काही वर्षे ऑपरेटर म्हणून कार्यरत होते. त्यानंतर त्यांची साक्री येथे बदली झाली होती. हुतात्मा जवान मिलिंद खैरनार हे लहानपणी आपल्या कुटुंबासह जैताणे येथील 33-KV वीज उपकेंद्राच्या शासकीय निवासस्थानात राहत होते. मिलिंद लहान असताना मी त्याला अंगाखांद्यावर खेळवले आहे" अशी प्रतिक्रिया त्यांच्या वडिलांचे जैताणे येथील निकटवर्तीय व वीज उपकेंद्राचे कर्मचारी विनोद शिवाजी महाले यांनी 'सकाळ'शी बोलताना दिली.

'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या :

Web Title: dhule news Martyr Jawan Milind Khairnar to pay homage