मोटारसायकल अपघातात आरोग्य सहाय्यक जागीच ठार

मोटारसायकल अपघातात आरोग्य सहाय्यक ठार
मोटारसायकल अपघातात आरोग्य सहाय्यक ठार

निजामपूर-जैताणे (साक्री-धुळे): आंबेमोहोर (ता. साक्री) येथील मूळ रहिवासी व नवापाडा आरोग्य केंद्राचे आरोग्य सहाय्यक शरद भुरू अहिरे (वय 44) रविवारी (ता. 26) सकाळी साडेनऊच्या सुमारास त्यांच्या मोटारसायकलने आंबेमोहोरहून निजामपूरकडे जात असताना साक्री-नंदुरबार रोडवरील टिटाणे फाट्याजवळ मागून येणाऱ्या पीक-अप गाडीने त्यांना जोरदार धडक दिल्याने, डोक्यास व हाता-पायास गंभीर दुखापत होऊन ते जागीच ठार झाले.

अपघात एवढा भीषण होता की, मयत शरद अहिरे यांचा मेंदू अक्षरशः डोक्यातून बाहेर आलेला होता. त्यांच्या डाव्या बाजूची हाता-पायांची हाडे व खांद्याजवळील हाडांचा चेंदामेंदा झालेला होता. पीक-अप गाडीही रस्त्याच्या उजव्या बाजूला पलटी झाली होती. सदर घटनेची माहिती मयताचे मोठे भाऊ भारत भुरु अहिरे यांना टिटाणे गावाचे सरपंच रफिक पिंजारी व आंबेमोहोर गावाचे रहिवासी नारायण गावीत यांनी दिली. त्यानंतर त्यांनी खाजगी बोलेरो वाहनाने मृतदेह जैताणे आरोग्य केंद्रात दाखल केला. पोलिस पंचनामा व कायदेशीर कागदोपत्री सोपस्कार पार पडल्यानंतर तेथे वैद्यकीय अधिकारी डॉ. गोपीन वळवी यांनी शवविच्छेदन केले. त्यांनतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.

सायंकाळी मयतावर त्यांच्या मूळ गावी शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. मयताचे मोठे बंधू भारत अहिरे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार वाहनचालक इम्रान राजू शेख (वय 28, रा. खांडबारा ता. नवापूर) याच्याविरुद्ध निजामपूर पोलिस ठाण्यात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयितास ताब्यात घेण्यात आले असून, सहाय्यक निरीक्षक दिलीप खेडकर, उपनिरीक्षक अनिल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार श्री. कोकणी घटनेचा पुढील तपास करीत आहेत

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com