'मावशी दवाखानामां सगळा उपचार व्हतस का?'- आमदारांनी केली चौकशी

दगाजी देवरे
शुक्रवार, 7 जुलै 2017

गटप्रमुख आमदार रघुवंशी यांनी रुग्णांना अहिराणीत भाषेत सुविधा मिळतात का.., की त्यासाठी पैसे घेतले जातात.. असेही विचारले.

म्हसदी : पंचायत राज समितीच्या पथकाने आज सकाळी येथे भेट दिली. धनदाईदेवी मंदिर परिसर व प्राथमिक आरोग्य केद्रांची पाहणी करत तपासणी केली. आरोग्य केद्रांत सुमारे अर्धा तास थेट रुग्णांशी संवाद साधत सर्व सुविधा मिळतात का याची चौकशी केली. आरोग्य केद्रांत गटप्रमुख आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी अहिराणी भाषेत 'मावशी दवाखानामां सगळा उपचार व्हतस का, काही अडचणी शेतंस का..?' असे विचारत वास्तवता जाणून घेतली.

समितीच्या पथकात साक्री तालुका गटप्रमुख आमदार चंद्रकांत रघुवशी (नंदुरबार), अॅड. के.सी. पाडवी (नंदुरबार), आमदार राजाभाऊ वाजे (सिन्नर) आदींचा समावेश आहे. येथील प्राथमिक आरोग्य केद्रांत महिला प्रसुती, कुटूंबकल्याण शस्त्रक्रिया, सर्पदशांची लस, कुत्र्याची लसची सुविधा आहे का.., आदी चौकशी करण्यात आली. गटप्रमुख आमदार रघुवंशी यांनी रुग्णांना अहिराणीत भाषेत सुविधा मिळतात का.., की त्यासाठी पैसे घेतले जातात.. असेही विचारले. यावेळी उपस्थित रुग्णांनी माहिती दिली. उपमुख्य कार्यकारी अधिकारी अर्जुन गुंडे, साक्री पंचायत समितीचे बीडीओ चंद्रकांत भावसार, उपअभियंता एस.जी. धिवरे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. अनुराधा लोया, डॉ. शिवकुमार सांगळे, अभियंता वसंत गुजांळ आदी उपस्थित होते. प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. वैशाली परदेशी, डाॅ. किशोर आगळे यांनी केद्रात असलेल्या सुविधांची माहिती दिली.

धनदाईदेवी मंदिरासही भेट
पथकाने धनदाईदेवी मंदिरास भेट दिली. मंदिर परिसरात असलेले मंगल कार्यालय, भक्त निवासासह मंदिराची पाहणी केली. कामे कशी झाली याविषयी आमदार रघुवशी, अॅड. पाडवी, आमदार वाजे यांनी चौकशी केली. तीर्थक्षेत्र विकास निधी, जिल्हा परिषदेच्या निधी व भाविकांच्या देणगीतून कामे झाल्याची माहिती धनदाईदेवी तरुण ऐक्य मडंळाचे अध्यक्ष हिंमतराव देवरे, सचिव सुभाष देवरे, जेष्ठ संचालक गंगाराम देवरे, उत्तमराव देवरे यांनी माहिती दिली. सरपंच सतीश देवरे, ग्रामपंचायत सदस्य कुंदन देवरे, विकास संस्थेचे अध्यक्ष महेंद्र देवरे, केशव देवरे, महेंद्र देवरे उपस्थित होते. मंदिरास शासनाचा 'ब' दर्जा मिळाल्याने नवीन कांमासाठी प्रस्ताव दिल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले.

काळगाव ग्रामपंचायतीलाही भेट
पथकाने काळगाव (ता. साक्री) येथील ग्रामपंचायतीला भेट दिली.सुमारे एक हजार 94 लोक संख्या असलेल्या गांवात असलेल्या सुविधांची समितीने चौकशी केली. जन सुविधा योजनेत झालेल्या ग्रामपंचायत इमारतीचे काम पाहून समाधान व्यक्त केले. जलयुक्त शिवार अभियानात होत असलेल्या कामांची चौकशी करत विचारपुस केली. ग्रामस्थांनी रस्ता व मोबाईल टाॅवरची मागणी केली. मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेत काम होईल असे आश्वासन ग्रामस्थांना देत तात्काळ काम व्हावे अशा अधिका-यांना सूचना करण्यात आल्या.उद्यान पंडित संजय भामरे, नरेंद्र ठाकरे, महेश ठाकरे, केशव ठाकरे, बाजीराव ठाकरे, सुकदेव सोनवणे, ग्रामसेविका रेखा विस्पुते उपस्थित होते.

Web Title: dhule news mla chandrakant raghuvanshi inspects health services