धुळे: वानराच्या अंत्ययात्रेला लोटला आख्खा गाव

जगन्नाथ पाटील
सोमवार, 17 जुलै 2017

बावीस जुलैला दशक्रिया विधी
स्मशानभूमीत श्रध्दांजलीपर भाषणेही झालीत. यावेळी सात दिवसांचा सार्वजनिक दुखवटा घोषीत करण्यात आला आहे. बावीस जुलैला दशक्रिया विधी होणार आहे. दुखवटा निवारण्यासाठी गावजेवणही होणार आहे.

धुळे : खान्देशात वयस्कर गृहस्थांची अंत्ययात्रा शाही थाटात निघत असते. सजविलेली डोली (तिरडी) बँड, गुलालाची उधळण आणि फटाक्यांची आतषबाजीही असतेच. अगदी अशीच अंत्ययात्रा बिलाडी (ता.धुळे) येथे रविवारी निघाली. ही अंत्ययात्रा वानराची होती. अंत्ययात्रेला आख्खा गाव लोटला होता. 22 जुलैला दशक्रीया विधीही ग्रामस्थांनी आयोजित केला आहे.

माणिक चिंधा पाटील यांच्या शेतात वानर मृत अवस्थेत आढळून आले. ही बाब संपूर्ण गावाला समजली. मृतदेह गावात आणण्यात अाला. पारंपारिक पध्दतीने अंत्यसंस्कार करण्याचा ग्रामस्थांनी घेतला. सायंकाळी पाचला अंत्ययात्रा काढण्यात आली. आबालवृध्दांसह आख्खा गावच अंत्ययात्रेला लोटला होता. चार खांदेकरीसह सगळ्यांनीच डोलीवजा तिरडीला खांदा दिला. दिवटी धरणार्‍याने पाणीही दिले.

बावीस जुलैला दशक्रिया विधी
स्मशानभूमीत श्रध्दांजलीपर भाषणेही झालीत. यावेळी सात दिवसांचा सार्वजनिक दुखवटा घोषीत करण्यात आला आहे. बावीस जुलैला दशक्रिया विधी होणार आहे. दुखवटा निवारण्यासाठी गावजेवणही होणार आहे.

बिलाडीसह कापडणे, न्याहळोद, सोनगीर, नगाव, वरखेडी, कुंडाणे परिसरात तीन आठवड्यांपासून पाऊस नाही. पाऊस पडण्यासाठी काहीतरी तोडगे करण्याची श्रध्दा आहे. यात पशूपक्ष्यासह जिवंत माणसाचीही अंत्ययात्रा काढण्याची प्रथा आहे. यानिमित्ताने आजची अंत्ययात्राही याच श्रध्देत पाऊस पडण्याचेच तोडगे मानले जात आहे.

ई सकाळवरील ताज्या बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा:

Web Title: Dhule news monkey cremation