निजामपूरच्या उपसरपंचपदी अनिता मोहने बिनविरोध

प्रा. भगवान जगदाळे
सोमवार, 2 ऑक्टोबर 2017

ग्रामपंचायतीत पुन्हा एकदा 'तनिष्का'राज

निजामपूर-जैताणे (साक्री-धुळे) : माळमाथा परिसरातील सतरा सदस्यीय निजामपूर (ता. साक्री) ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी तनिष्का तथा ग्रामपंचायत सदस्या अनिता विशाल मोहने यांची बिनविरोध निवड झाली. नुकताच एक वर्षाचा कार्यकाळ पूर्ण झाल्याने तनिष्का गटप्रमुख तथा उपसरपंच रजनी रमेश वाणी यांनी राजीनामा दिला होता. त्या पार्श्वभूमीवर ही निवड झाली. 17 पैकी 14 सदस्य उपस्थित होते तर 3 सदस्य गैरहजर होते.

ग्रामपंचायतीत पुन्हा एकदा 'तनिष्का'राज

निजामपूर-जैताणे (साक्री-धुळे) : माळमाथा परिसरातील सतरा सदस्यीय निजामपूर (ता. साक्री) ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी तनिष्का तथा ग्रामपंचायत सदस्या अनिता विशाल मोहने यांची बिनविरोध निवड झाली. नुकताच एक वर्षाचा कार्यकाळ पूर्ण झाल्याने तनिष्का गटप्रमुख तथा उपसरपंच रजनी रमेश वाणी यांनी राजीनामा दिला होता. त्या पार्श्वभूमीवर ही निवड झाली. 17 पैकी 14 सदस्य उपस्थित होते तर 3 सदस्य गैरहजर होते.

रविवारी (ता. 1) सकाळी 10 वाजता सरपंच साधना विजय राणे यांच्या अध्यक्षतेखाली निजामपूर ग्रामपंचायत कार्यालयात उपसरपंच निवडीसाठी विशेष सभा बोलविण्यात आली होती. ग्रामपंचायत सदस्या सुनंदा बेंद्रे व अनिता मोहने ह्या दोन्ही सदस्यांनी नामांकन पत्रे घेतली. परंतु दिलेल्या मुदतीत केवळ अनिता मोहने यांचा एकमेव नामांकन अर्ज दाखल झाल्याने अकराच्या सुमारास ग्रामविकास अधिकारी एस. एम. पवार यांनी त्यांच्या बिनविरोध निवडीची घोषणा केली. ग्रामपंचायत सदस्य परेश वाणी सूचक होते तर सुनील बागले अनुमोदक होते. यावेळी माजी सरपंच तथा विद्यमान ग्रामपंचायत सदस्य अजितचंद्र शाह, सलीम पठाण, परेश वाणी, दीपक देवरे, जाकीर तांबोळी, सुनील बागले आदींसह तनिष्का तथा ग्रामपंचायत सदस्या रजनी वाणी, दिलनूरबी सय्यद, कमलबाई मोरे, अनिता मोहने, मालुबाई शिरसाठ, इंदूबाई भिल, कासुबाई भिल आदींची प्रमुख उपस्थिती होती. ग्रामपंचायत सदस्य प्रवीण वाणी, रवींद्र वाणी व सुनंदाबाई बेंद्रे हे तिन्ही जण गैरहजर होते.

उपसरपंचपदी अनिता मोहने यांची बिनविरोध निवड जाहीर होताच त्यांचे समर्थक व कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी करत एकच जल्लोष केला. सरपंच साधना राणे, मावळत्या उपसरपंच रजनी वाणी, माजी सरपंच अजितचंद्र शाह, सलीम पठाण आदींसह ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य व पदाधिकाऱ्यांनी त्यांचा सत्कार केला. यावेळी गटनेते तथा पंचायत समिती सदस्य वासुदेव बदामे, युसूफ सय्यद, मिलिंद भार्गव, विजय राणे, रमेश वाणी, महेश राणे, पंकज शाह, विशाल मोहने, दीपक मोरे आदींनी बिनविरोध निवडीसाठी प्रयत्न केले.

उपसरपंच निवड प्रक्रियेवर आक्षेप...
ग्रामपंचायत सदस्य प्रवीण वाणी, भाजपचे निजामपूर शहराध्यक्ष तथा माजी ग्रामपंचायत सदस्य महेंद्र वाणी, हेमंत बेंद्रे आदींनी उपसरपंच निवड प्रक्रियेवर आक्षेप घेतला. नामांकनपत्रे दाखल करणे, त्याची छाननी करणे, माघार घेणे, निवडणूक घेणे व निकाल घोषित करणे याबाबतच्या स्वतंत्र लेखी वेळापत्रकाची मागणी श्री. वाणी यांनी सरपंच व ग्रामविकास अधिकारी यांच्याकडे केली. त्यावरून शाब्दिक खडाजंगी व बाचाबाची झाली. याबाबत आपण न्यायालयात दाद मागू अशी प्रतिक्रिया श्री. वाणी यांनी 'सकाळ'शी बोलताना दिली.

Web Title: dhule news nijampur gram panchayat election