आदर्श विद्या मंदिरात गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव !

प्रा. भगवान जगदाळे
शनिवार, 20 जानेवारी 2018

निजामपूर-जैताणे (धुळे): माळमाथा परिसरातील निजामपूर-जैताणे शिक्षण प्रसारक मंडळ संचलित आदर्श विद्या मंदिर व कनिष्ठ महाविद्यालयात पाचवी ते बारावीच्या सुमारे सत्तर गुणवंत विद्यार्थ्यांचा संचालक मंडळासह मान्यवरांच्या हस्ते गुणगौरव करण्यात आला. संस्थेचे ज्येष्ठ संचालक ऍड. शरदचंद्र शाह कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.

निजामपूर-जैताणे (धुळे): माळमाथा परिसरातील निजामपूर-जैताणे शिक्षण प्रसारक मंडळ संचलित आदर्श विद्या मंदिर व कनिष्ठ महाविद्यालयात पाचवी ते बारावीच्या सुमारे सत्तर गुणवंत विद्यार्थ्यांचा संचालक मंडळासह मान्यवरांच्या हस्ते गुणगौरव करण्यात आला. संस्थेचे ज्येष्ठ संचालक ऍड. शरदचंद्र शाह कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.

व्यासपीठावर संस्थेचे उपाध्यक्ष सुहास शाह, शालेय समिती अध्यक्ष अजितचंद्र शाह, सचिव नितीन शाह, संचालक बारीक पगारे, राघो पगारे, पालक-शिक्षक संघाचे उपाध्यक्ष पावबा बच्छाव, मुख्याध्यापक जयंत भामरे, उपमुख्याध्यापक राजेंद्र चौधरी, पर्यवेक्षक राजेंद्र जाधव, सुरेश माळी, पालक शांतीलाल माळी, नाना वाणी आदींची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी विविध शालेय उपक्रम व स्पर्धांमधील यशस्वी विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते रोख बक्षिसे, शालेय साहित्य, स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरव झाला. त्यात चित्रकला स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, निबंधलेखन स्पर्धा, कथालेखन स्पर्धा, कथाकथन स्पर्धा, प्रश्नमंजुषा स्पर्धा, सामान्यज्ञान स्पर्धा, हस्ताक्षर स्पर्धा, गीतगायन स्पर्धा, अपूर्व विज्ञान मेळावा व आदर्श विद्यार्थी आदी उपक्रमांचा समावेश आहे. इयत्ता नववीची विद्यार्थिनी प्रांजली प्रमोद राणे हिचा कै. मणीलाल उत्तमदास शाह यांच्या स्मरणार्थ 'आदर्श विद्यार्थिनी' हा विशेष पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.

यावेळी पालक-शिक्षक संघाचे उपाध्यक्ष पावबा बच्छाव, कार्यक्रमाचे अध्यक्ष संस्थाचालक ऍड. शरदचंद्र शाह आदींनी मनोगत व्यक्त केले. संगीतशिक्षक जयंती कासार, राम चिंचोले यांच्या गीतमंचाने ईशस्तवन सादर केले. मुख्याध्यापक जयंत भामरे यांनी प्रास्ताविक केले. सत्यनारायण शिरसाठ, विवेक बधान यांनी सूत्रसंचालन केले. भिकाजी गावीत यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.

Web Title: dhule news nijampur jaitane aadarsha vidya mandir student