खुल्या टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेत एमसीसी क्रिकेट संघ विजयी

प्रा. भगवान जगदाळे
सोमवार, 26 मार्च 2018

निजामपूर-जैताणे (धुळे) : येथील एमसीसी क्रिकेट क्लब व जैताणे (ता. साक्री) येथील सिद्धिविनायक क्रिकेट क्लबतर्फे खुडाणे रोडवरील राणे ऑइल मिलच्या मैदानावर शिवजयंतीनिमित्त खुल्या टेनिस बॉल 'डे-नाईट' क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. महिनाभर चाललेल्या या क्रिकेट मालिकेच्या शनिवारी झालेल्या (ता. २४) अंतिम सामन्यात निजामपूरच्या एमसीसी क्रिकेट संघाने खुडाणेच्या क्रिकेट संघाचा पराभव करत अंतिम विजेतेपद पटकावले. उपांत्य सामन्यांत निजामपूरच्या एमसीसी क्रिकेट संघाने नंदुरबार संघाचा, तर खुडाणे क्रिकेट संघाने धुळे संघाचा पराभव केला होता.

या स्पर्धेत उत्तर महाराष्ट्रातील धुळे, जळगाव, नाशिक, नंदुरबार जिल्ह्यांसह गुजरात, मध्य प्रदेशातील एकूण ८० संघ सहभागी झाले होते. प्रत्येक सहभागी संघाला अकराशे रुपये प्रवेशशुल्क होते. विजेत्या व उपविजेत्या संघांना छत्रपती चषक देण्यात आले. त्यात एमसीसी क्रिकेट संघाला मिलिंद भार्गव व क्वालिटी सोशल ग्रुपतर्फे ५१ हजाराचे प्रथम पारितोषिक देण्यात आले. तर भरत बिऱ्हाडे (व्यारा) व पोलीस उपनिरीक्षक तुषार भदाणे पुरस्कृत २१ हजाराचे द्वितीय पारितोषिक खुडाणे क्रिकेट संघाला ज्येष्ठ शिक्षक शालिग्राम भदाणे यांच्या हस्ते देण्यात आले. एमसीसी क्रिकेट संघाचे कर्णधार राहुल पवार व खुडाणे क्रिकेट संघाचे कर्णधार महेश काळे यांनी आपापल्या संघांसह अनुक्रमे प्रथम व द्वितीय पारितोषिक स्वीकारले. अन्य दात्यांकडून विशेष कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना एकतीसशे व एकविसशे रुपयांची एकूण बारा प्रोत्साहनपर वैयक्तिक बक्षिसे देण्यात आली.

जिल्हा बँकेचे संचालक हर्षवर्धन दहिते, पंचायत समिती सदस्य उत्पल नांद्रे, वासुदेव बदामे, साक्री नगरपालिकेचे सभापती सुमित नागरे, युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रदीप नांद्रे, क्वालिटी सोशल ग्रुपचे अध्यक्ष मिलिंद भार्गव, निजामपूरच्या सरपंच साधना राणे, सहाय्यक निरीक्षक दिलीप खेडकर, पराग माळी, सतीश वाणी, परेश वाणी, तुषार भदाणे, युसूफ सय्यद, जाकीर तांबोळी, ज्ञानेश्वर पवार, मोहन ब्राम्हणे, पंकज वाघ आदी मान्यवरांनी स्पर्धेदरम्यान भेटी दिल्या.

मान्यवरांनी मनोगतातून खिलाडूवृत्तीचे महत्व पटवून दिले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी निजामपूरच्या एमसीसी क्रिकेट क्लब व जैताणेच्या सिद्धिविनायक क्रिकेट क्लबच्या क्रिकेटप्रेमी युवकांनी विशेष परिश्रम घेतले. क्वालिटी प्रोव्हिजन, विजय ट्रेडर्स, सिद्धिविनायक ग्रुप, रॉयल फार्मा, साई ट्रॅक्टर (व्यारा), सतीश वाणी, सुरेश माळचे आदींचे सौजन्य व विशेष सहकार्य लाभले. ग्रामपंचायत सदस्य परेश वाणी, कर्णधार राहुल पवार, किरण पगारे, शरद पेंढारे, भुरा पेंढारे, गुलाब न्याहळदे, संजय न्याहळदे, कैलास पगारे, अर्जुन अहिरे, भूषण पगारे, दर्शन परदेशी, प्रवीण आडगाळे, संदीप बागुल किरण सूर्यवंशी, रघुनाथ बच्छाव, चेतन जगदाळे, गणेश बागुल, संजय पिसाळ, निखिल येवले, प्रशांत पवार, हर्षल मोरे, राज कासार, पराग भावसार, हेमंत सूर्यवंशी, आदींनी आयोजन केले.

Web Title: dhule news nijampur jaitane cricket