निजामपूर-जैताणेत डॉ. आंबेडकर जयंती-उत्सव समिती गठीत

प्रा. भगवान जगदाळे
शनिवार, 24 मार्च 2018

निजामपूर-जैताणे (धुळे) : विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या आगामी १२७व्या जयंतीनिमित्त नुकतीच जैताणे (ता. साक्री) येथे जयंतीउत्सव समिती गठीत करण्यात आली. त्यानिमित्त झालेल्या बैठकीत अध्यक्षपदी सामाजिक कार्यकर्ते रविराज जाधव, उपाध्यक्षपदी हिरामण जगदेव, सचिवपदी देवाजी जाधव, तर खजिनदारपदी सिद्धार्थ जगदेव यांची सर्वानुमते निवड झाली.

अन्य कार्यकारिणी अशी : सहसचिवपदी भूषण भैसे, सल्लागारपदी गुलाब जगदेव, सहसल्लागारपदी दादाजी बच्छाव, प्रसिद्धिप्रमुखपदी संगम बागुल, तर समितीच्या सदस्यपदी दीपक इंदवे, सागर पवार, सचिन जाधव आदींसह एकूण अकरा सदस्यांची निवड करण्यात आली. यावेळी सर्व समिती सदस्यांचे अभिनंदन करण्यात आले.

व्याख्यान, प्रतिमापूजन व मिरवणुकीचे नियोजन
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त निजामपूर-जैताणेत दोन दिवस कार्यक्रमांची रेलचेल आहे. त्यात धुळे येथील युवावक्ते सतीश अहिरे यांचे प्रेरणादायी जाहीर व्याख्यान होईल. १४ तारखेला सकाळी आठ वाजेच्या सुमारास जैताणे ग्रामपंचायत चौकात प्रतिमापूजन, दुपारी चारला डॉ. आंबेडकर चौकापासून गावातील मुख्य मार्गांवरुन डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची भव्य शोभायात्रा व मिरवणूक निघणार आहे. उपस्थितीचे आवाहन संयोजकांनी केले आहे.

Web Title: dhule news nijampur jaitane dr babasaheb ambedkar jayanti