कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनेची अर्थमंत्र्यांसोबतची चर्चा फिस्कटली

प्रा. भगवान जगदाळे
गुरुवार, 22 मार्च 2018

निजामपूर-जैताणे (धुळे): कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनेची बुधवारी (ता.२१) अर्थमंत्र्यांसोबत उर्वरित, प्रलंबित मागण्यांसंदर्भात ठरल्यानुसार बैठक झाली. तीत अर्थविभागाशी संबंधित कोणत्याही मागणीवर निर्णय न झाल्याने बोलणी फिस्कटली. त्यामुळे संघटनेतर्फे २६ मार्चला एका दिवसाचे लाक्षणिक उपोषण करण्यात येणार आहे.

निजामपूर-जैताणे (धुळे): कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनेची बुधवारी (ता.२१) अर्थमंत्र्यांसोबत उर्वरित, प्रलंबित मागण्यांसंदर्भात ठरल्यानुसार बैठक झाली. तीत अर्थविभागाशी संबंधित कोणत्याही मागणीवर निर्णय न झाल्याने बोलणी फिस्कटली. त्यामुळे संघटनेतर्फे २६ मार्चला एका दिवसाचे लाक्षणिक उपोषण करण्यात येणार आहे.

शासनाने तरीही शासनाने सकारात्मक निर्णय न घेतल्यास उर्वरित उत्तरपत्रिका व गुणपत्रिका बोर्डात जमा न करण्याचा आक्रमक पवित्रा संघटनेने घेतला असून, बारावीचा निकाल लांबल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी शासनाचीच असेल असा गर्भित इशारा कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनेचे राज्याध्यक्ष प्रा. अनिल देशमुख, सरचिटणीस प्रा. संजय शिंदे, नाशिक विभागाचे अध्यक्ष प्रा. बी. ए. पाटील आदींसह पदाधिकाऱ्यांनी शासनाला दिला आहे.

सकारात्मक निर्णय न घेतल्यास उर्वरित उत्तरपत्रिका व गुणपत्रिका बोर्डात जमा न करण्याचा आक्रमक पवित्रा संघटनेने घेतला असून, बारावीचा निकाल लांबल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी शासनाचीच असेल असा गर्भित इशारा कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनेचे राज्याध्यक्ष प्रा. अनिल देशमुख, सरचिटणीस प्रा. संजय शिंदे, नाशिक विभागाचे अध्यक्ष प्रा. बी. ए. पाटील आदींसह पदाधिकाऱ्यांनी शासनाला दिला आहे.

"सर्व कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक, परीक्षक व नियामक आदी सर्वांच्या सहभागाने महासंघाच्या आदेशानुसार आंदोलन यशस्वी झाले. परंतु अर्थखात्याशी संबंधित मागण्यांबाबत अर्थमंत्री अधिवेशनानंतर निर्णय घेवू असे म्हणत आहेत. यात धोका होवू शकतो म्हणून अधिवेशन संपण्यापूर्वीच निर्णय होवून आदेश निघाले पाहीजेत याकरीता दि.२६ मार्चपासून मंत्रालयासमोर उपोषण केले जाणार आहे. तरी शिक्षक, परीक्षक व नियामकांनी महासंघाच्या पुढील आदेशाशिवाय मंडळाकडे कोणतेही साहीत्य (उत्तरपत्रिका, गुणपत्रिका व इतर कागदपत्रे) जमा करणेसाठी जावू नये. आपली कामे पूर्ण करून तयारीत असावे. महासंघाच्या आदेशाचे पालन करावे. कोणी फुटीरवादीपणा केल्यास त्यांचा नावानिशी जाहीर निषेध करण्याची वेळ संघटनेवर येवू नये. तरी सहकार्य करावे व आंदोलन यशस्वी करावे ही महासंघाच्या आदेशावरून विनंती करण्यात येत आहे."
...प्रा. बी. ए.पाटील, अध्यक्ष, कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटना, नाशिक विभाग व सर्व पदाधिकारी.

Web Title: dhule news nijampur jaitane junior college professor strike