'अंनिस'चे सभासदत्व स्वीकारत सत्काराला दिले अनोखे उत्तर

प्रा. भगवान जगदाळे
सोमवार, 12 मार्च 2018

निजामपूर-जैताणे (धुळे) : येथील 'अंनिस' शाखेतर्फे एमबीबीएस उत्तीर्ण झाल्याबद्दल डॉ. सुरभी हेमंत पाटील हिचा 'अंधश्रद्धा निर्मूलन' वार्तापत्राचे अंक देऊन नुकताच सत्कार करण्यात आला. सुरभिने 'अंनिस'चे सभासदत्व स्वीकारत 'अंधश्रद्धा निर्मूलन' या मासिक वार्तापत्राचे वार्षिक वर्गणीदार होऊन आपल्या सत्काराला अनोखे उत्तर दिले. डॉ. हेमंत पाटील यांच्या निवासस्थानी हा सत्कार करण्यात आला.

डॉ. सुरभी पाटील ही 'अंनिस'चे शाखाध्यक्ष डॉ. हेमंत पाटील यांची कन्या आहे. डॉ. पाटील यांचाही समितीतर्फे सत्कार करण्यात आला. यावेळी 'अंनिस'चे जिल्हा प्रधान सचिव प्रा. दीपक बाविस्कर, जिल्हा युवा कार्यवाह किरण ईशी, व्यसनमुक्ती शाखेचे प्रचारक नवल ठाकरे, कार्याध्यक्ष प्रा. भगवान जगदाळे, नवनिर्वाचित उपाध्यक्ष डॉ. प्रकाश गवळे, राजेश बागुल, शाखा कार्याध्यक्ष मनोज भागवत, प्रधान सचिव रामचंद्र भलकारे, सांस्कृतिक कार्यवाह सतीश बाविस्कर, सदस्य तुषार जगदाळे, संगीता सैंदाणे आदी उपस्थित होते.

Web Title: dhule news nijampur jaitane surbhi patil

टॅग्स