खानदेशात आता धोंडी धोंडी पाणी दे...!

जगन्नाथ पाटील
रविवार, 6 ऑगस्ट 2017

पाणी मागण्याची प्रथा
पाऊस पडावा म्हणेन महिला मजूर, मुले पाणी मागत आहेत. डोक्यावर मातीची घागर त्यात निमचा पाला असतो. घरासमोर जात त्यात महिला पाणी टाकीत ओवाळणी करीत आहेत. पारंपारीक आवाळणी गीते गात आहेत. डोळ्यांत आसवे उभी राहतात; असा त्यांचा भावार्थ आहे.

कापडणे (जि.धुळे) : धोंडी धोंडी पाणी दे सायमा पिकू दे. धोंड्याची शेती पाणी आला राती. भाकर देवो माय, पाणी येई ओ माय, आमीन पाणीवाल्या बाया ओ माय आमले पाणी द्या लवकरी, कुणबी राजा गया खेतमा, बिगर पाणीनं परजा व्हयी काय ओ माय आदी प्रकारची गाणी म्हणत शेतमजूर महिला पावसाची आवळणी करीत आहेत. घरोघरी जात पाणी मागत आहेत. असे चित्र आता तालुक्यात गावोगावी दिसू लागले आहे.

गेल्या एक महिन्यापासून पाऊस नाही. पावसाचे वातावरण आहे. पण पाऊस कोसळत नसल्याची वस्तूस्थिती आहे. शेती शिवारातील पिकांची स्थिती नाजूक झाली आहे. वाढ खुंटली आहे. कडधान्ये पिकांचा हंगाम वाया गेला आहे. कापूस, मका, ज्वारी, बाजरी तग धरुन उभी आहेत. जोरदार पावसाची नितांत गरज आहे. शेती शिवारात पावसा अभावी कामे नाहीत. मजूरांना कामे नाहीत. उपासमारीची वेळ अाली आहे. दररोजच आकाशाकडे बघत दिवस मावळत आहेत. शेतकर्‍यांसह मजूरही चिंतातूर झाले आहेत.

पाणी मागण्याची प्रथा
पाऊस पडावा म्हणेन महिला मजूर, मुले पाणी मागत आहेत. डोक्यावर मातीची घागर त्यात निमचा पाला असतो. घरासमोर जात त्यात महिला पाणी टाकीत ओवाळणी करीत आहेत. पारंपारीक आवाळणी गीते गात आहेत. डोळ्यांत आसवे उभी राहतात; असा त्यांचा भावार्थ आहे.

दरम्यान धुळे तालुक्यासह शिंदखेडा, शिरपूर व साक्री तालुक्यांमध्ये(पश्चिम पट्याचा अपवाद वगळता) पिकांची स्थिती नाजूकच अाहे. तिन्ही तालुक्यातील प्रकल्पांमध्ये मृत जलसाठा आहे.

Web Title: Dhule news no rain in khandesh