धुळे : पाऊस न झाल्याने शेतकरीवर्ग हवालदिल

एल. बी. चौधरी
रविवार, 13 ऑगस्ट 2017

यावेळी माळी समाजाचे अध्यक्ष आर.के.माळी, ग्रामपंचायत सदस्य राजेंद्र जाधव, शेतकरी प्रभूदास गुजर, दिनेश बडगुजर, यादव माळी, राजूलाल माळी गिरीश गुजर, गोपाल माळी, हेमंत माळी आदी उपस्थित होते. त्यांनी सोनगीर परिसर दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर करावा अशी मागणी केली आहे. दरम्यान पाऊस नसल्याने पिण्याच्या पाणी व चाऱ्याचा प्रश्न गंभीर झाला आहे.

सोनगीर जि. धुळे : पावसाळा अर्धा संपला तरी येथे व परिसरात अद्याप एकही मोठा पाऊस न झाल्याने शेतकरीवर्गासह सर्वच हवालदिल झाले आहेत. 32 दिवसापासून हलक्या सरी देखील नाहीत. चार पाच दिवसांत पाऊस न झाल्यास 1972 सारखा भयावह दुष्काळाची पुनरावृत्ती होण्याची शक्यता नाकारता येत नाही. आज कृषी विभागाने सोनगीर मंडळ अंतर्गत खरीप पिकांची स्थिती पहाणी केली. त्यावेळी सर्व पिके नष्ट झाल्याचे व आता पाऊस पडून ही पिके येण्याची शक्यता मावळली असल्याचे त्यांनी सांगितले. 

येथे गेल्या दोन वर्षांपासून दुष्काळ पडला आहे. परिसरातील सर्व तलाव, धरण, विहिरी कोरडे पडले आहे. पावसाच्या यंदा वाढलेल्या अपेक्षा देखील भंग झाल्या आहेत. सोनगीर कृषी मंडळ विभागांतर्गत सोनगीरसह दापुरा, दापुरी, धनूर, सरवड, कापडणे आदी गावांचा समावेश होतो. या परिसरात आतापर्यंत फक्त 119 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. म्हणजेच सरासरी 18 टक्के पाऊस झाला आहे. वास्तविक आतापर्यंत सर्वसामान्यपणे 650 मिमी पाऊस पडायला हवा होता. त्यातुलनेत 119 मिमी पाऊस झाला यावरून परिस्थिती किती गंभीर आहे याची कल्पना येते. मंडल कृषी अधिकारी पी. ए. पाटील, कृषी सहाय्यक एस. डी. भदाणे, व्ही. जी. पाटकर यांनी केलेल्या पहाणी नुसार कापूस, भुईमूग, ज्वारी, बाजरी तसेच फळबागेतील आवळा, बोर आदींचे उत्पादन येण्याची शक्यता मावळली असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी माळी समाजाचे अध्यक्ष आर.के.माळी, ग्रामपंचायत सदस्य राजेंद्र जाधव, शेतकरी प्रभूदास गुजर, दिनेश बडगुजर, यादव माळी, राजूलाल माळी गिरीश गुजर, गोपाल माळी, हेमंत माळी आदी उपस्थित होते. त्यांनी सोनगीर परिसर दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर करावा अशी मागणी केली आहे. दरम्यान पाऊस नसल्याने पिण्याच्या पाणी व चाऱ्याचा प्रश्न गंभीर झाला आहे.

Web Title: Dhule news no rain last 32 days in Songir