निजामपूरला वर्षाबेन शाह स्मृतिनिमित्त काव्यगायन स्पर्धा

प्रा. भगवान जगदाळे
शुक्रवार, 22 सप्टेंबर 2017

निजामपूर (धुळे) : येथील जवाहरलाल वाचनालयातर्फे स्व. वर्षाबेन अजितचंद्र शाह स्मृतिनिमित्त सातवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी नुकतीच काव्यगायन स्पर्धा घेण्यात आली. तीत 22 स्पर्धकांनी सहभाग नोंदवला. वाचनालयाचे अध्यक्ष नयनकुमार शाह, सचिव नितीन शाह, संचालक मनोहर राणे, शैलेश शाह, कपिल शाह, संजय शाह, जयंती कासार आदींच्या हस्ते प्रतिमापूजन करून स्पर्धेचे उदघाटन करण्यात आले.

पात्रता फेरीत एकूण 120 विद्यार्थ्यांचा सहभाग होता. त्यापैकी 22 विद्यार्थ्यांची अंतिम फेरीत निवड करण्यात आली. आदर्श विद्या मंदिर व इंदिरा गांधी विद्यालयातील विद्यार्थी-विद्यार्थिनी या स्पर्धेत सहभागी झाले होते. या स्पर्धेत श्रावणी भामरे प्रथम, राजनंदिनी बच्छाव द्वितीय, अनुराग जगदाळे व रुबल धनगर तृतीय आले. तर ज्योत्स्ना धनगर व दीपाली जगताप उत्तेजनार्थ मानकरी ठरले.

शिक्षक भिकाजी गावीत, कन्हैयालाल चौरे, विवेक बधान आदींनी स्पर्धेचे परीक्षण केले. राजेश शाह यांनी सूत्रसंचालन केले. चंद्रकांत शिंपी यांनी आभार मानले. वाचनालयाचे कर्मचारी जयवंत शाह, प्रतीक शाह आदींनी परिश्रम घेतले. यावेळी स्पर्धकांनी आई, बाप, शेतकरी, निसर्ग, संसार, लेक वाचवा आदी विषयांवर उत्स्फूर्त काव्यगायन सादर करून उपस्थितांची भरभरून दाद मिळवली. या स्पर्धेत माया बच्छाव, कोमल खैरनार, पूजा सोनवणे, महेश झालटे, प्रसाद सोनवणे, धीरज जाधव, गौरव जाधव, शिवम पवार, तुषार जाधव, दीपाली वाघमोडे, निकिता जाधव व श्वेता जाधव आदींनी सहभाग नोंदवला.

'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या : 

Web Title: dhule news Poetry competition in Nizampur