धुळेजवळ अपघातात दुचाकीस्वार प्राध्यापक ठार

prof sanjay thackrey
prof sanjay thackrey

भरधाव ट्रॅव्हल्सची धडक; चालक फरार
धुळे: धुळे-अमळनेर रस्त्यावरील लोंढवे (ता. अमळनेर) शिवारात आज (गुरुवार) सकाळी सातच्या सुमारास भरधाव खासगी ट्रॅव्हल्सने ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात प्राध्यापकाच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. त्यात दुचाकीवरील प्राध्यापक जागीच ठार झाला. अपघात एवढा भीषण होता, की प्राध्यापकाचा मृतदेह छिन्नविछिन्न झाला.

सातरणे (ता. धुळे) येथील मूळ रहिवासी प्रा. संजय युवराज ठाकरे (वय 37) असे मृत प्राध्यापकाचे नाव आहे. ते नवलनगर (ता. धुळे) येथील नूतन उच्च माध्यमिक विद्यालयात मराठीचे प्राध्यापक म्हणून कार्यरत होते व सध्या अमळनेर येथे मुलांच्या शिक्षणासाठी वास्तव्यास होते. लहानपणापासूनच एका पायाने अपंग असलेल्या प्रा. ठाकरे यांनी मोठ्या जिद्दीने शिक्षण पूर्ण करत प्राध्यापकाची नोकरी मिळविली होती. ते अमळनेर येथून रोज नवलनगर येथे दुचाकीने ये-जा करत. आज सकाळी ते नवलनगरकडे येत असताना सकाळी सातच्या सुमारास लोंढवे (ता. अमळनेर) शिवारात सिंडिकेट कंपनीच्या खासगी ट्रॅव्हल्सने (एमएच19/वाय6292) भरधाव जाताना प्रा. ठाकरे यांच्या ऍक्‍टिव्हा (एमएच18/एक्‍यू8869) या दुचाकीला जोरदार धडक दिली. त्यात प्रा. ठाकरे यांचा जागीच मृत्यू झाला.

धडक एवढी भीषण होती, की ठाकरे यांचा मृतदेह छिन्नविछिन्न झाला. अपघातानंतर त्यांचा मृतदेह रस्त्यावरच पडला होता. अपघातानंतर ट्रॅव्हल्सचा चालक फरार झाला. अपघातामुळे मार्गावरील वाहतूक बराच वेळ ठप्प झाली होती. अपघाताची माहिती मिळताच रस्त्याने जाणारी अन्य वाहनचालक व लोंढवे, सातरणे, नवलनगर येथील ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. प्रा. ठाकरे यांचा मृतदेह अमळनेर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आला. तेथे विच्छेदन झाले. घटनेमुळे हळहळ व्यक्त होत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com