Dhule News : शिरपूर येथे लॉजवर छापा

Dhule News
Dhule News esakal

शिरपूर : युवक-युवतींना अश्लील चाळे करण्यासाठी जागा उपलब्ध करून देत असल्याच्या संशयावरून शहर पोलिसांनी मेन रोडमागे असलेल्या सुदर्शन लॉजवर शनिवारी (ता. २८) सकाळी छापा टाकला.

पोलिसांची चाहूल लागताच संबंधित फरारी झाले. लॉजमालकाविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला.शहरातील मेन रोडच्या मागील बाजूस असलेल्या सुदर्शन लॉजमध्ये अश्लील चाळे सुरू असल्याबाबत परिसरातील नागरिकांनी पोलिसांकडे तक्रार केली होती. (Dhule News Raid on lodge at Shirpur)

त्यामुळे निरीक्षक ए. एस. आगरकर, हवालदार ललित पाटील, लादूराम चौधरी, मनोज पाटील, महिला पोलिस पौर्णिमा पाटील, अनिता पावरा, प्रवीण गोसावी, अमित रनमळे, गोविंद कोळी, मुकेश पावरा, सचिन वाघ आदींनी लॉजवर छापा टाकला.

मात्र पोलिसांना पाहून युवक-युवती पळून गेल्याचे आढळले. पोलिसांनी लॉजच्या खोल्यांची पाहणी केली असता तेथील गाद्या, बेडशीट, उशी आदी अस्ताव्यस्त अवस्थेत आढळले.

हेही वाचा : T+1 Settlement मुळे वाढेल शेअर बाजारातली उलाढाल

Dhule News
Dhule News : City Survey उताऱ्यासाठी आत्मदहनाचा प्रयत्न

लॉजच्या काउंटरवर असलेल्या दर्शन दशरथ पाटील (वय २३, रा. महेशनगर, शिरपूर) याच्याकडे विचारणा केली असता पळून गेलेल्या युवक-युवतींची कोणतीच नोंद नसल्याचे दिसून आले.

संबंधितांचे ओळखपत्रही त्याने घेतले नव्हते. लॉजमालकाविरोधात हवालदार स्वप्नील बांगर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला.

Dhule News
Dhule Crime News : ATMची हेराफेरी करणारी टोळी सांगवी पोलिसांकडून गजाआड

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com