धुळे: पावसामुळे तामसवाडीजवळ रस्ता गेला वाहून

धनंजय सोनवणे
शनिवार, 10 जून 2017

घटनास्थळी पोलिस दाखल झाले असून त्यांनी साक्रीकडून धुळ्याकडे जाणारी वाहने शेवाळी, धमनार, म्हसदी, देऊर, नेर या पर्यायी रस्त्याने वळवली, धुळ्याकडून येणारी वाहनेही याच रस्त्याने येत असून, यामुळे राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक काही प्रमाणात सुरळीत झाली अाहे.

साक्री - साक्रीसह (जि. धुळे) परिसरात शुक्रवारी सायंकाळनंतर पावसाने दमदार हजेरी लावली. साक्री तालुक्यातील या पहिल्याच पावसात महीर, तामसवाडी, कृष्णनगर, टेंभे आदी परिसराला तडाखा बसला.

यात धुळे- सुरत राष्ट्रीय महामार्गावरील तामसवाडीजवळ यंत्रणेने तयार केलेला तात्पुरता पर्यायी रस्ता वाहून गेला. त्यामुळे वाहतूक खोळंबली. पावसामुळे धुळे जिल्ह्यातील हा चौथा रस्ता वाहून गेला आहे. तीन दिवसांपूर्वीच धुळे तालुक्यांतील तीन सर्व्हीस रोड वाहून गेले होते.

सद्य:स्थितीत नागपूर- धुळे-सुरत या राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम सुरू आहे. यामध्ये अनेक ठिकाणी जुने पूल जमीनदोस्त केले जात असून तेथे नव्याने पूल उभारणी होत आहे. या राष्ट्रीय महामार्गावरील तामसवाडीलगत खोल नाला आहे. या नाल्यावरील जुना पूल पाडून नवा पूल तयार करण्याचे काम सुरू आहे. त्या ठिकाणी पर्यायी रस्ता तयार केला गेला आहे. मात्र शुक्रवारी सायंकाळनंतर झालेल्या पावसामुळे महीर, तामसवाडी, कृष्णनगर, टेंभे आदी परिसरात जोरदार पाऊस झाल्याने नाल्यास पूर आला व हा पर्यायी रस्ताच वाहून गेला. त्यामुळे धुळे- साक्रीची वाहतूक पूर्णतः खोळंबली.

घटनास्थळी पोलिस दाखल झाले असून त्यांनी साक्रीकडून धुळ्याकडे जाणारी वाहने शेवाळी, धमनार, म्हसदी, देऊर, नेर या पर्यायी रस्त्याने वळवली, धुळ्याकडून येणारी वाहनेही याच रस्त्याने येत असून, यामुळे राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक काही प्रमाणात सुरळीत झाली अाहे.

ई सकाळवरील आणखी ताज्या बातम्यांसाठी क्लिक करा -
पुणे: मोदी फेस्टच्या कार्यक्रमाला खासदार, आमदारांची दांडी
लष्कराने घुसखोरीचा कट उधळला; 5 दहशतवादी ठार
महात्मा गांधी 'चतुर बनिया' होते: अमित शहा
धुळे: कर्जमाफीच्या वाऱ्यामुळे शेतकरी सभासदांनी थकविले 134 कोटी
बाईला बाई होण्यासाठी कर भरावा लागणार?
#स्पर्धापरीक्षा -'ईएनव्हीआयएस' पर्यावरण पोर्टल​
ब्रिटनमध्ये त्रिशंकू स्थिती​

'सिद्धेश्‍वर'ची चिमणी पाडण्यास कोणी नाही तयार
जिगरबाज बांगलादेशचा न्यूझीलंडवर विजय

Web Title: Dhule news rain in dhule