अफवांची आठवडाभरातील तिसरी घटना

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 2 जुलै 2018

धुळे - मुले पळविणाऱ्यांची टोळी आली आहे, ते अमुक विचारतात, बहाणा करतात अन्‌ मुलांना पळवून नेतात, अशा आशयाचे ‘मेसेज’ गेल्या आठवडाभरात ‘व्हायरल’ झाले. या ‘मेसेज’ची खात्री न करताच अनेक जण संशयितांना मारहाण करत आहेत. आठवडाभरात अशा दोन घटना घडल्या असून, राईनपाड्याची आजची तिसरी घटना आहे. तीन दिवसांपूर्वी म्हसावद (ता. शहादा) येथे, काल (ता. ३०) रात्री भाडणेजवळ (ता. साक्री) अशाच तिघांवर संशय घेण्यात आला होता. म्हसावद येथील गृहस्थ तर शहाद्याचे नगरसेवकच निघाले. त्यामुळे सोशल मीडिया अशा अफवा पसरविण्याचे साधन होऊ पाहत आहे, याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे.

मजुराच्या शोधार्थ फिरत होते 
म्हसावद (ता. शहादा) येथेही तीन-चार जण कारने आले. ते चौकशी करू लागल्याने ग्रामस्थांचा संशय बळावला. तेवढ्यात गर्दी जमा झाल्याने वादावादी सुरू झाली. संबंधित आपण शहादा येथील असल्याचे सांगू लागले तेवढ्यात जमावाने त्यांची कार जाळण्याचा प्रयत्न केला. शेवटी त्यांनी आपण शहाद्याचे नगरसेवक असल्याचे सांगत काहींचा संदर्भ दिला तेव्हा कुठे जमाव शांत झाला.

या साऱ्या घटनांमागे अफवा आणि सोशल मीडियावरील व्हायरल क्‍लिप असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. नागरिकांनी कायदा हातात न घेता पोलिसांना कळवावे, असे आवाहन करण्यात येत आहे.

भाडणेत टोळीचा संशय
कासारे ः साक्री ते भाडणेदरम्यान कान नदीवरील पुलाजवळ काल रात्री मुले चोरणाऱ्यांच्या टोळीतील चार संशयित आढळल्याने एकच पळापळ झाली. मात्र, ते फरार झाले. शेकडो तरुण रात्री उशिरापर्यंत टोळीचा शोध घेत होते. काल (ता. ३०) रात्री दहाच्या सुमारास चार जण भाडणे ग्रामस्थांना कान नदीवरील पुलावर आढळले अन्‌ टोळीची बातमी वाऱ्यासारखी पसरली. असंख्य तरुण घटनास्थळी जमा झाले. तत्काळ साक्री पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलिस हजर झाले. मात्र, तोवर ते पसार झाल्याचे सांगण्यात आले.

Web Title: dhule news Rumors murder third incident child theft case