खेड्यातील शाळेला पुणे येथील अविरतची भरीव मदत

school help
school help

कापडणे (जि.धुळे) : फेसबुक आणि व्हाॅटसअॅपच्या माध्यमातून विविध विधायक गोष्टी घडत असल्याचे पुढे येवू लागले आहे. याच्यातून येणार्‍या काळात भरीव काम घडण्याची अपेक्षाही जाणकारांकडून व्यक्त होवू लागली आहे. येथील शंभर टक्के अदिवासी विद्यार्थी असलेल्या जिल्हा परीषद शाळा क्रमांक चारची माहिती व उपक्रम शिक्षकांनी फेसबुक आणि व्हाॅटस अॅपच्या माध्यमातून अपलोड केले आहेत. अन या शाळेला पुणे व मुंबईतून भरीव मदत होवू लागली आहे. पावरा भाषा बोलणार्‍या विद्यार्थ्यांना शाळेचा मोठा लळा लागला आहे.

पुणे येथील अविरत फाउंडेशनची भरीव मदत
पुणे येथील अविरत आणि प्रयत्न फाउंडेशनचे  अध्यक्ष निलेश पिंगळे यांनी शाळेतील ऐंशी विद्यार्थ्यांना प्रत्येकी दप्तर, चार वह्या, पेन, कंपासपेटी, वाॅटर बॅग , टीफीन आणि पॅड असे साहित्य दिले आहे. वितरण पिंगळे यांच्या हस्ते झाले. यावेळी शिक्षण विस्तार अधिकारी बी.ए. भामरे, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मुरलीधर पाटील, केंद्रप्रमुख एम.के. खैरनार, जया पाटील, मुख्याध्यापक बोरसे, लेखिका स्मिता सराफ, हर्षदा बोरसे, विद्या पाटील आदी उपस्थित होते.

फेसबुकने शाळा पोहचलीय राज्यभरात
येथील शिक्षक विद्यार्थ्यांसाठी विविध शैक्षणिक उपक्रम राबवितात. शैक्षणिक साधने बनवितात. नाट्यछटा तयार करतात. ते युट्युबवर टाकतात. स्वतंत्र फेसबुक अंकाऊंटवर अपलोड करतात. राज्यातील शैक्षणिक गृपवर पाठवितात. परीणामी शाळा राज्यभरात पोहचली आहे. तसेच आदिवासी विद्यार्थ्यांसाठी मदतीची अपेक्षाही व्यक्त करतात. पुण्या मुंबईतील लेखकांनी पुस्तकांची भरीव मदत केली आहे. ग्रामस्थासह बाहेरील शिक्षण प्रेमींनी शाळा डिजिटल केली आहे.

दरम्यान शिक्षकांच्या भरीव योगदानाबद्दल शिक्षण सभापती नुतन पाटील, सरपंच भटू पाटील, उपसरपंच प्रभाकर पाटील व पंचायत समिती सदस्य उषा माळी यांनी शमाधान व्यक्त केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com