'बस नही, गाडी नही फिरभी... स्कूल चले हम'

जगन्नाथ पाटील
सोमवार, 17 जुलै 2017

बससाठीही ताटकळावे लागते...
मुंबई-आग्रा महामार्गावरील देवभाने फाट्यावर बर्‍याचशा बसेस थांबत नाही. विशेष जलद व अतीजलद बसेसनाही येथे थांबा आहे. तास अर्धा तास विद्यार्थ्यांना ताटकळावे लागते. बसचालकाच्या मर्जीवरच येथे बसेस थांबतात. विशिष्ट बसचालक बसमध्ये गर्दी असूनही विद्यार्थ्यांना घेवून जातात. काही बसचालक खाली बसेसही येथे थांबावायला तयार नाहीत ; अशी खंत विद्यार्थी व्यक्त करतात.

कापडणे (जि.धुळे) : दररोज दोन्ही बाजूंनी मिळून सहा किमीचा प्रवास अनिवार्यच आहे. त्यानंतर देवभाने फाट्यावर तास अर्धा तास ताटकळत उभे राहावे लागते. तेव्हा कोठे बस थांबते. परतीच्या प्रवासातही तेच हाल असतात. शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी कोणीही पुढारी त्यांच्याकडे बघायला तयार नाहीत. वर्षोनुवर्ष हीच स्थिती आहे. धुळे तालुक्यातील कापडणे, धमाणे, सरवड येथील विद्यार्थ्यांसाठी वेळेवर बसच नाही. असेलही ती राष्ट्रीय महामार्गावर थांबत नाही. हे विद्यार्थी बस नही गाडी नही स्कुल चले हम असे म्हणतच पायी प्रवास करीत आहेत.

राजकारणी का नाही करत प्रयत्न
कापडणे पंचवीस हजार लोकवस्तीचे गाव आहे. निवडणूकीत सर्व पक्षांचा या गावाकडे डोळा असतो. एकमेकांवर कुरघोडी करण्यात सर्वच पुढे असतात. गावात दोन वेळाच बस येते. त्याही योग्यवेळी नाहीत. धुळे शहरात शिक्षणासाठी शंभरावर विद्यार्थी जातात. त्यांना मुंबई-आग्रा महामार्गावरील देवभाने फाट्यापर्यंत पायीच जावे लागते. दररोज सहा किमीचा पायी प्रवास त्यांच्या पाचवीलाच पुजलेला आहे. विद्यार्थी सायकलीवर तर विद्यार्थीनी पायीच प्रवास करतात. राजकारणी दररोज यांना बघतात. त्यांच्यासाठी आंदोलन करण्याचेही त्यांच्या मनात येत नसल्याने विद्यार्थी संताप व्यक्त करीत आहेत.

बससाठीही ताटकळावे लागते...
मुंबई-आग्रा महामार्गावरील देवभाने फाट्यावर बर्‍याचशा बसेस थांबत नाही. विशेष जलद व अतीजलद बसेसनाही येथे थांबा आहे. तास अर्धा तास विद्यार्थ्यांना ताटकळावे लागते. बसचालकाच्या मर्जीवरच येथे बसेस थांबतात. विशिष्ट बसचालक बसमध्ये गर्दी असूनही विद्यार्थ्यांना घेवून जातात. काही बसचालक खाली बसेसही येथे थांबावायला तयार नाहीत ; अशी खंत विद्यार्थी व्यक्त करतात.

येथे कर्मचारी नेमावा
मागच्या वर्षी विद्यार्थ्यांनी आंदोलन केले होते. तेव्हा या गजबजलेल्या फाट्यावर परीवहन मंडळाने एक स्वतंत्र कर्मचारी महिनाभर येथे नियुक्त केला होता. आंदोलन शांत झाले. तसे हा कर्मचारीही गायब झाला. आता पुन्हा आंदोलन करण्याच्या पावित्र्यात विद्यार्थी आहेत. देवभाने फाट्यासह सरवड, नगाव, शिरुड, मुकटी, अजंग आदी ठिकाणीही अशीच समस्या असल्याचे पुढे आले आहे. येथील विद्यार्थीही बसच्या लहरीपणाने त्रस्त झाले आहेत.

ई सकाळवरील ताज्या बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा:

Web Title: Dhule news school student bus issue