'कोणत्याही पक्षात असा, पण शिवजयंतीला एकत्र दिसा' : प्रकाश पाटील

प्रा. भगवान जगदाळे
गुरुवार, 22 फेब्रुवारी 2018

तिथीनुसार सर्वपक्षीय संयुक्त शिवजयंती सोहळ्याची जय्यत पूर्वतयारी

निजामपूर-जैताणे (धुळे): येत्या 4 मार्चला निजामपूर-जैताणेत दोन्ही गावे मिळून तिथीनुसार सर्वपक्षीय संयुक्त शिवजयंती साजरी होणार आहे. दोन्ही गावांतील मुख्य मार्गांवरुन भव्य शोभा यात्रा व मिरवणूकही काढण्यात येणार आहे. त्यासंदर्भात विचारविनिमय व नियोजन करण्यासाठी जैताणे (ता.साक्री) येथील ग्रामदेवता भवानीमाता मंदिरात मंगळवारी (ता. 20) रात्री नऊला शिवभक्तांची संयुक्त बैठक झाली. ज्येष्ठ शिवसैनिक प्रकाश पाटील बैठकीच्या अध्यक्षस्थानी होते.

यावेळी शोभायात्रा, मिरवणूक व आर्थिक नियोजनाबाबत चर्चा करण्यात आली. उपस्थित देणगीदारांनी उत्स्फूर्तपणे एक हजारापासून ते एकवीस हजारांपर्यंत देणग्या जाहीर केल्या. यासंदर्भात यापूर्वीही दोनदा बैठका झाल्या होत्या. ही तिसरी व अंतिम बैठक होती. गेल्या अनेक वर्षांपासून निजामपूर-जैताणेत तिथीनुसारच संयुक्त शिवजयंती साजरी केली जाते. ही परंपरा निरंतर सुरू रहावी म्हणून पक्षभेद विसरून सर्व ग्रामस्थ व कार्यकर्ते एकत्र येतात. यावेळी शिवसेनेचे माजी जिल्हा उपप्रमुख प्रकाश पाटील, पंचायत समिती सदस्य वासुदेव बदामे, सरपंच संजय खैरनार, ग्रामपंचायत सदस्य गणेश देवरे आदींनी मनोगत व्यक्त केले. "कोणत्याही पक्षात असा, पण शिवजयंतीला एकत्र दिसा" असे प्रतिपादन शिवसेनेचे माजी जिल्हा उपप्रमुख प्रकाश पाटील यांनी बैठकीत केले. पंचायत समिती सदस्य वासुदेव बदामे यांनी 'आगामी काळात शिवभक्तांनी दोन्ही गावात दहा रुपयात झुणका भाकर केंद्र सुरू करावे' अशी सूचना मांडली. महेंद्र महाले यांनी सूत्रसंचालन केले.

बैठकीस शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख भुपेश शाह, तालुका उपप्रमुख प्रवीण वाणी, त्रिलोक दवे, निजामपूर शहराध्यक्ष भय्या गुरव, जैताणे शहराध्यक्ष रवींद्र खैरनार, महेश खैरनार, राजेंद्र शाह, गोकुळ गवळे, राहुल जयस्वाल, समता परिषदेचे तालुकाध्यक्ष राजेश बागुल, ग्रामपंचायत सदस्य ईश्वर न्याहळदे, परेश वाणी, युवा सेनेचे दर्शन परदेशी, शरद पेंढारे, परशराम खलाणे, राकेश शेवाळे, किशोर वाघ, राजेंद्र जयस्वाल, गुणेश शाह, रवींद्र जाधव आदींसह ग्रामस्थ व तरुण मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Web Title: dhule news shivjayanti politics social prakash patil