पत्रकारदिनानिमित्त शिवसेना, युवा सेनेतर्फे पत्रकारांचा सत्कार

प्रा. भगवान जगदाळे
सोमवार, 8 जानेवारी 2018

निजामपूर-जैताणे (धुळे) : माळमाथा परिसरातील जैताणे-निजामपूर (ता. साक्री) येथील शिवसेना, युवासेनेतर्फे 'दर्पण'कार बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त ग्रामदेवता भवानीमाता मंदिरात शनिवारी (ता. 6) सायंकाळी प्रथमच पत्रकार दिन साजरा करण्यात आला. त्यात निजामपूर-जैताणेतील विविध दैनिकांच्या पत्रकारांचा सत्कार करण्यात आला. शिवसेनेचे माजी जिल्हा उपप्रमुख प्रकाश पाटील कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.

यावेळी व्यासपीठावर पत्रकार रघुवीर खारकर, शकील शेख, ताहीरबेग मिर्झा, भगवान जगदाळे, तनवीर शेख, रवींद्र सूर्यवंशी, रवींद्र जाधव, त्रिलोक दवे आदी उपस्थित होते. शिवसैनिक व युवासैनिकांच्या हस्ते पत्रकारांना शाल, श्रीफळ, गुलाबपुष्प देऊन गौरविण्यात आले. याप्रसंगी रघुवीर खारकर, शकील शेख, ताहीरबेग मिर्झा, भगवान जगदाळे, रवींद्र जाधव, प्रकाश पाटील आदींनी मनोगते व्यक्त केलीत. पत्रकार बांधवांनी शिवसैनिक व युवासैनिकांप्रती ऋण व्यक्त केले.

शिवसेनेचे माजी जिल्हा उपप्रमुख प्रकाश पाटील, तालुका उपप्रमुख त्रिलोक दवे, विभाग प्रमुख महेश खैरनार, पांडव गुरव, युवासेनेचे दर्शन परदेशी, जैताणे शहर प्रमुख रविंद्र खैरनार, भूषण पगारे, अर्जुन अहिरे, भैय्या गुरव, रोहीत दहिते, बापू खैरनार, नितीन बोरसे, सुनिल बाविस्कर, अविनाश मोरे, विकेश मोरे आदींसह सर्व शिवसैनिक व युवासैनिकांनी कार्यक्रमाचे संयोजन केले. रवींद्र सूर्यवंशी यांनी सूत्रसंचालन केले. रवींद्र खैरनार यांनी आभार मानले.

Web Title: dhule news shivsena Journalists felicitation in jaitane nijampur