'फॉलोअॅप'मुळे शेकडो बालकांचे प्राण वाचणार; अॅप मोफत

एल. बी. चौधरी
सोमवार, 31 जुलै 2017

सोनगीर (जि. धुळे): येथील मुळ रहिवासी असलेल्या व सध्या मुंबईत राहणाऱ्या स्वाती निर्मल हुंबड (वय 25) हिने अल्पवयात एक मोबाईल अॅप तयार केले असून, त्यामुळे भारतातील लाखो बालकांना वेळेवर लसीकरण मिळून बालमृत्यूचे प्रमाण कमी होईल. हे अॅप पूर्णपणे मोफत आहे.

सोनगीर (जि. धुळे): येथील मुळ रहिवासी असलेल्या व सध्या मुंबईत राहणाऱ्या स्वाती निर्मल हुंबड (वय 25) हिने अल्पवयात एक मोबाईल अॅप तयार केले असून, त्यामुळे भारतातील लाखो बालकांना वेळेवर लसीकरण मिळून बालमृत्यूचे प्रमाण कमी होईल. हे अॅप पूर्णपणे मोफत आहे.

भारतात दरवर्षी 26 दशलक्ष बालके जन्माला येतात. पण त्यापैकी फक्त एक तृतीयांश बालकांना वेळेवर लसीकरण मिळते. उर्वरित 18 दशलक्ष बालके विविध आजारांना बळी पडण्याची शक्यता असते, त्यात काही बालके दगावतात. स्वाती हुंबड हिला या समस्येची जाणीव झाली. बालकांच्या निरामय आरोग्यासाठी वेळेवर व वेळोवेळी लसीकरण होणे आवश्यक आहे. म्हणून तिने याबाबतीत महिलांना विशेषतः गरोदर व नवजात मातांना जागरूक करण्याचा प्रयत्न सुरू केला. प्रत्येकीला भेटून माहिती देणे अशक्य होते म्हणून तंत्रज्ञानाची मदत घेण्याचे तिने ठरवले. आणि या समस्येवर उपाय तिने शोधून काढला. तंत्रज्ञानावर आधारित एक परिणामकारक उपाय तिने व तिच्या सहकाऱ्यांनी शोधून काढला. त्याला नाव दिले फॉलोअप. (Followapp) आणि एका गंभीर विषयाकडे महिलांचे लक्ष वेधून घेतले.

गरोदर महिला व अर्भकाचे आरोग्य यासंदर्भात कार्य करणाऱ्या एका स्वयंसेवी संस्थेबरोबर काम करतांना स्वातीला मुंबईच्या झोपडपट्टीत अनेक गर्भवती व स्तनदा मातांमध्ये आपल्या बालकांना कधी व कसे लसीकरण करायचे याबाबत योग्य माहितीचा अभाव दिसून आला. वेळेवर लसीकरण होत नसल्याने बालकांना आजार व अन्य शारीरिक समस्येला तोंड द्यावे लागत असल्याचे तिला दिसून आले.

ही समस्या सोडविण्यासाठी तिने मोबाईलचा उपयोग केला. मुंबईच्या झोपडपट्टीत किंवा अन्यत्रही लोकांना पिण्याचे शुध्द पाणी मिळत नसेल पण त्यांच्याकडे अॅण्ड्रॉईड मोबाईल जरूर असतो. फॉलोअप हे लसीकरण वेळेवर घेण्याबाबत आईला आठवण करून देईल. ते एक स्वतःहून आठवण करून देणारे व त्यानंतर पुढे कधी जावे लागेल याची माहिती देणार आहे. हे अॅप लसीकरण, आहाराचे वेळापत्रक आदींबाबत आपोआप व्हॉईस कॉलने कळवेल आणि नोंद देखील ठेवेल. बालकाच्या लसीकरणाचा दर्जा व सद्यस्थितीचा संपूर्ण आराखडा व अपडेट यात समाविष्ट आहेत. केंद्र सरकारने सुदृढ बालक योजना सुरू केली असून वेगवेगळे लसीकरण शिबीरे घेतली जात आहेत. व त्याची माहिती एकत्र केली जात आहे. हा अॅप यासाठी उपयुक्त ठरेल यात शंका नाही.

फॉलोअप या अॅपसाठी कोणताही खर्च लागत नसल्याने देशातील गरीब व दारिद्र्य रेषेखालील मातांनाही याचा फायदा होईल. फक्त एक कॉल येईल तो मातेने उचलायचा. तिला तिच्या बाळाचे लसीकरण बाबत संपूर्ण माहिती व लसीकरणाची तारीख, वेळ व सर्व अपडेट मिळेल.

बाळाच्या लसीकरणाच्या समस्यांवर उपाय शोधताना अनेक आव्हानाला तोंड द्यावे लागले. आठ महिने अखंड प्रयत्न केल्यानंतर अखेर अॅप तयार झाले. मुंबईच्या मालवणी भागातील झोपडपट्टीत सुरूवात
केली. मुंबईच नव्हे बाहेरही परराज्यातील अधिकाधिक महिला या अॅपशी जोडले जाणे आवश्यक आहे.

येथील (कै.) डॉ. गे. म. हुंबड व शकुंतला हुंबड यांची नात असून, निर्मल हुंबड यांच्या कन्या आहेत. तिने आपल्या शैक्षणिक कॅरिअरमध्ये तिने मिडलस्कूल व हायस्कूल स्कॉलरशिप मिळवली आहे. दहावीत शाळेत प्रथम क्रमांक पटकावला. बिर्ला इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी येथे तिने अभियांत्रिकी पदवी मिळवली आहे. तिचा भाऊ अभिषेक हुंबड याचे प्रगतीशील युवा उद्योजक म्हणून फोर्बस यादीत नाव झळकले आहे. त्यांचे वडील निर्मल हुंबड सोनगीरच्या जिल्हा परिषद शाळा व एन. जी. बागूलहायस्कूलमध्ये शिकले. पुण्यात अभियांत्रिकीचे शिक्षण घेतले. जपान, जर्मनी, इराक, कुवैत आणि बांगलादेश येथे त्यांनी काम केले आहे. आई मुंबईच्या पाटकर महाविद्यालयात भौतिकशास्त्र विषयाच्या प्राध्यापिका आहेत.

ई सकाळवरील ताज्या बातम्यांसाठी क्लिक करा:

Web Title: dhule news swati humbad creat Followapp for child health