धुळे जिल्ह्यातील तलाठी तहसिलदारांकडे कारभार सोपविणार!

जगन्नाथ पाटील
शनिवार, 14 ऑक्टोबर 2017

तीस पदे रिक्त
जिल्ह्यात तीस तलाठी पदे रिक्त आहेत. धूळे, साक्री, शिंदखेडा व शिरपूरमध्ये अनुक्रमे तीन, बारा, दहा व पाच पदे रिक्त आहेत. अतिरिक्त सजांचा कारभार मानगुटीवर आहे. त्याच बरोबर अवैध वाळू वाहतूक तपासणी, पिक विमा योजना , आपत्तीवेळी पंचनामा, शिधा पत्रिका तपासणी आदीं कामांमुळे तलाठी हैराण झाले आहेत. वरिष्ठ सांगतात काहीही सांगू नका. डिल्केरेशन झाले एवढेच सांगा आदींमुळे स्वतःसह तलाठ्यांचे कौटुंबिक स्वास्थ्यही हरपले आहे. यावर योग्य निर्णय होणे अपेक्षित आहे.

धुळे : आॅनलाईन साता बारासाठी सर्व्हर डाऊन आहे. चालते तर वेग मंद आहे. निवडणूकीसह विविध कामे करावीच लागतात. जिल्ह्यात तीस तलाठी पदे रिक्त आहेत. अतिरिक्त सजांचा कारभार मानगुटीवर आहे. आता हे सर्व अती झाले आहे. काही पर्यायच निघत नाही. या सर्व कामांचा व्याप तहसिलदारांकडे जमा करण्याचा निर्धार तलाठी संघाने केला आहे. तसे निवेदनच आज जिल्हाधिकारी दिलिप पांढरपट्टे यांना धुळे जिल्हा तलाठी संघाने दिले.

निवेदनाचा आशय असा : सातबारा सह इतर अहवालांचे रिएडेटिंग करण्याचे काम सुरु आहे. पण सर्व्हर डाऊनची मोठी अडचण आहे. चाललेच तर गती मंद आहे. अहवाल क्रमांक पाच व सात होतो. एकसारखी नावे असूनही एकत्रीकरण होत नाही. नावांची स्पेलिंग दुरुस्ती करुनही सातबारा अंमल दिसून येत नाही. खातेदाराच्या नावासमोरील क्षेत्र व इतर अधिकारांचा मजकूर अंमल नष्ट होतो. चावडी वाचनाची प्रिंट ही आजतागायत सातबारामधील कंस दिसत नाहीत.

तीस पदे रिक्त
जिल्ह्यात तीस तलाठी पदे रिक्त आहेत. धूळे, साक्री, शिंदखेडा व शिरपूरमध्ये अनुक्रमे तीन, बारा, दहा व पाच पदे रिक्त आहेत. अतिरिक्त सजांचा कारभार मानगुटीवर आहे. त्याच बरोबर अवैध वाळू वाहतूक तपासणी, पिक विमा योजना , आपत्तीवेळी पंचनामा, शिधा पत्रिका तपासणी आदीं कामांमुळे तलाठी हैराण झाले आहेत. वरिष्ठ सांगतात काहीही सांगू नका. डिल्केरेशन झाले एवढेच सांगा आदींमुळे स्वतःसह तलाठ्यांचे कौटुंबिक स्वास्थ्यही हरपले आहे. यावर योग्य निर्णय होणे अपेक्षित आहे.

दरम्यान अध्यक्ष एन.वाय.कुलकर्णी, सरचिटणीस वाय. आर. पाटील, एस.बी.मोहिते, ए.ए. भामरे, सी. व्ही. पाटील, आर. एल. सोनार, पी.एस. वाघ आदींनी जिल्हाधिकारी पांढरपट्टे यांना निवेदन दिले.

Web Title: Dhule news tahsildar work