सोनगीरमध्ये तनिष्का गटातर्फे जनजागृती, प्रशिक्षण 

एल. बी. चौधरी
रविवार, 28 जानेवारी 2018

पंचायत समिती सदस्या माळी यांनी रोजगाराच्या विविध संधी तसेच पंचायत समितीच्या विविध योजनांबाबत माहिती दिली. व लाभ घेण्याचे आवाहन केले. प्लॅस्टिकच्या पिशव्या वापरू नयेत त्याऐवजी कापडी पिशव्या वापराव्यात असे आवाहन त्यांनी केले. यावेळी कापडी पिशव्या बनविण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

सोनगीर (जिल्हा धुळे) : महिला आता कोणत्याही क्षेत्रात मागे नाहीत. ग्रामीण महिलांनी रूढी परंपरामध्ये गुरफटून न जाता स्वत:ची ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न करावा. चूल व मूल सांभाळत कुटुंबांचे उत्पन्न वाढीसाठी प्रयत्न करावा. त्यासाठी विविध प्रशिक्षणाचा लाभ घ्यावा असे आवाहन पंचायत समिती सदस्या व तनिष्का गट  प्रमुख  रुपाली माळी यांनी केले.

येथील तनिष्का गटातर्फे हळदी कुंकवाचे औचित्य साधून येथील विठ्ठल रखुमाई देवस्थान मंदिराच्या सभागृहात महिला सबलीकरण, स्वयंरोजगाराविषयक मार्गदर्शन व पर्यावरण जनजागृती आदी कार्यक्रम घेण्यात आले. महिलांंना कापडी पिशव्या आणि सिंदूर पेन्सिल वाटण्यात आले. 

पंचायत समिती सदस्या माळी यांनी रोजगाराच्या विविध संधी तसेच पंचायत समितीच्या विविध योजनांबाबत माहिती दिली. व लाभ घेण्याचे आवाहन केले. प्लॅस्टिकच्या पिशव्या वापरू नयेत त्याऐवजी कापडी पिशव्या वापराव्यात असे आवाहन त्यांनी केले. यावेळी कापडी पिशव्या बनविण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. फेब्रुवारीमध्ये वेगवेगळ्या वस्तू बनविण्याचे दोन प्रशिक्षण घेण्यात येणार आहे. असेही सांगण्यात आले. तनिष्का सदस्या शकुंतला चौधरी यांनी आभार मानले. यावेळी ज्योती देवरे, तनिष्का सदस्या शकुंतला चौधरी, प्रतिभा ताराचंद लोहार, नीता संजय परदेशी, छाया चंद्रशेखर परदेशी, वैशाली ज्ञानेश्वर चौधरी,  संगीता रामकृष्ण चौधरी, डॉ. सीमा अजय सोनवणे, शारदा वामन मोरे, सुलभा ईशी आदी उपस्थित होते.

Web Title: Dhule news Tanishka programme