उपक्रमशील शिक्षकांना 'गुरुगौरव पुरस्कार' प्रदान

उपक्रमशील शिक्षकांना 'गुरुगौरव पुरस्कार' प्रदान

निजामपूर-जैताणे (धुळे): धुळे येथील ओबीसी विद्यार्थी-शिक्षक-पालक विकास असोसिएशनतर्फे महात्मा जोतीराव फुले स्मृतिदिन हा दिवस दरवर्षी 'शिक्षकदिन' म्हणून साजरा केला जातो. त्या पार्श्वभूमीवर असोसिएशनचे अध्यक्ष विलासराव पाटील यांनी क्रांतिसूर्य महात्मा फुले पुण्यतिथीचे औचित्य साधून सन-२०१७ च्या गुरुगौरव पुरस्कारार्थी, उपक्रमशील शिक्षकांची यादी जाहीर केली होती. त्यात धुळे जिल्ह्यातील प्राथमिक, माध्यमिक, कनिष्ठ महाविद्यालयीन व वरिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक, प्राध्यापकांच्या चारही गटातील अनुक्रमे १०, ३४, ८ व २ अशा एकूण ५४ शिक्षक, प्राध्यापकांना सन्मानित करण्यात आले.

असोसिएशनतर्फे दरवर्षी नाशिक विभागातील धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक व नगर या पाचही जिल्ह्यातील उपक्रमशील शिक्षकांकडून गुरुगौरव पुरस्कारासाठी प्रस्ताव मागविण्यात येतात. त्यातील निकषपात्र उपक्रमशील शिक्षकांना गुरुगौरव पुरस्कार देऊन संस्थेतर्फे गौरविण्यात येते. यावर्षी पाचही जिल्ह्यातील एकूण १०७ शिक्षकांना हा पुरस्कार देण्यात आला. त्यात प्राथमिक गटातून २१, माध्यमिक गटातून ७०, कनिष्ठ महाविद्यालयीन गटातून ११, तर वरिष्ठ महाविद्यालयीन गटातून ५ शिक्षक, प्राध्यापकांचा समावेश आहे. धुळे येथील गरुड वाचनालयाच्या सभागृहात हा कार्यक्रम घेण्यात आला. ओबीसी शिक्षक असोसिएशनचे अध्यक्ष विलासराव पाटील कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.

काँग्रेसच्या प्रदेश सरचिटणीस ऍड. ललिता पाटील, प्रकाश सोनवणे, विलासराव पाटील आदी मान्यवरांच्या हस्ते कार्यक्रमाचे उदघाटन, पुस्तिका प्रकाशन व पुरस्कार वितरण झाले. यावेळी व्यासपीठावर प्रा. एस. के. चौधरी, एस. एम. पाटील, राजेंद्र लोंढे, आर. व्ही. पाटील, प्राचार्य डॉ. सुरेश नंदन, मधुकर गांगुर्डे, प्रा. भरत काळे, प्रा. सुनील पवार, प्रा. शैलेश राणे, प्रल्हाद साळुंके, महेश मुळे, सुनील मोरे, झाकीर सय्यद, दीपक महाले, किशोर पाटील, प्रा. आर. ओ. मगरे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी ऍड. ललिता पाटील, प्रकाश सोनवणे, विलासराव पाटील आदींनी मनोगत व्यक्त केले.

धुळे जिल्ह्यातील पुरस्कारार्थी शिक्षक, प्राध्यापक पुढीलप्रमाणे :
कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयीन गटातून प्रा. दीपक बाविस्कर, प्रा. बी. एस. चौधरी, प्रा. डॉ. प्रवीण नेरपगार, प्रा. पंकज पाटील (सर्व धुळे), प्रा. भगवान जगदाळे (निजामपूर-जैताणे), प्रा. डॉ. एस. एस. पाटील (शिंदखेडा), प्रा. पी. के. पाटील (बेटावद), प्रा. डी. पी. पाटील (साक्री), प्रा. भागवत पाटील (शिरूड), प्रा. अनिल पाटील (शिरपूर) आदी.

माध्यमिक विभागातून सुनील पाटील, उदय तोरवणे, विजय जगताप, व्ही. बी. पाटील, एम. आर. अमृतकर, मधुकर माळी, एस. एम. मोरे, एस. व्ही. बैसाणे, सतिष खलाणे, एस. एम. पाटील, जे. बी. सोनवणे, विशाल निकम, आर. डी. शिरसाठ, सुरेश गोसावी, कमलेश भदाणे (सर्व धुळे), डी. एस. खैरनार (चिंचवार), विजय साळुंके (म्हसदी), एम. टी. गुजर (सायने-नंदाणे), राहुल पाटील (नरडाणा), विजय सूर्यवंशी (पिंपळगाव), एस. एस. जाधव, प्रवीण मोरे (पिंपळनेर), भूषण पवार (सवाई मुकटी), अब्दुल कुरेशी (निजामपूर), राकेश पगारे (सामोडे), विजय अहिरे (रामी), राजेश महाजन (खेडे), इंदासराव चंद्रकांत (सोनगीर), युवराज भदाणे (बोरीस), निलेश पाटील (शिरपूर), राजेश सोनवणे (कळमसरे), किशोर देवरे (बोरकुंड), भूषण पवार (सवाई मुकटी), रावसाहेब बैसाणे (शिंदखेडा) आदी.

तर प्राथमिक विभागातून राकेश जाधव (लोणखेडे), पावबा बच्छाव (वाजदरे), प्रकाश जाधव (चिलाणे), गोकुळ पाटील (दिवाणमळा), सौ. कांचन सैंदाणे (कुंडाणे), किशोर माळी (जापी), सदाशिव माळी (बेटावद), संतोष माळी (दहिवद), रत्ना गुजर (धुळे), सागर मोरे (धुळे) आदींसह जळगाव, नंदुरबार, नाशिक, नगर जिल्ह्यातील एकूण १०७ शिक्षक, प्राध्यापकांना हा पुरस्कार देण्यात आला.*

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी ओबीसी शिक्षक असोसिएशनचे अध्यक्ष विलासराव पाटील (धुळे) यांच्यासह संस्थेचे उपाध्यक्ष प्रवीण पाटील (चोपडा), ईश्वर महाजन (अमळनेर), विश्वस्त संजय खलाणे (धुळे), सतीश वैष्णव (थोरगव्हाण), काशिनाथ माळी (ब्राम्हणवेल),  प्रा. जितेंद्र पगारे (धुळे), व्ही. आर. महाजन (भडगाव),  वसुंधरा लांडगे (अमळनेर), वासुदेव माळी (नंदुरबार), अनिल सोनवणे (जैताणे), रुपेश कुलकर्णी (धुळे) आदींनी विशेष परिश्रम घेतले. ईश्वर महाजन यांनी प्रास्ताविक केले. वसुंधरा लांडगे, काशिनाथ माळी, सतीश वैष्णव, महेंद्र जगताप यांनी सूत्रसंचालन केले. रूपेश कुलकर्णी यांनी आभार मानले. कार्यक्रमास शिक्षक, प्राध्यापकांसह त्यांचे संस्थाचालक, कुटुंबीय, आप्तेष्ट, नातेवाईक व मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

विलासराव पाटील यांना भावी आमदारकीच्या शुभेच्छा...
सन २००६ व २०१२ मध्ये विलासराव पाटील यांनी विधान परिषदेच्या शिक्षक आमदारकीची निवडणूक लढवली. पण त्यात त्यांना यश आले नाही. मात्र आगामी काळात "जो खरा शिक्षक आहे", त्यालाच आमदार म्हणून निवडून दिले पाहिजे, असा सूर शिक्षकांमध्ये उमटला. त्या पार्श्वभूमीवर आगामी शिक्षक आमदारकीच्या निवडणुकीत शिक्षकांचे प्रश्न सोडवण्यासाठी विलासराव पाटील यांना पाठिंबा देण्याचे भावनिक आवाहनही त्यांच्या कार्यकर्त्यांनी यावेळी केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com