धुळे: 38 मंडळामध्ये स्वयंचलित हवामान केंद्र कार्यान्वित

तुषार देवरे
गुरुवार, 3 ऑगस्ट 2017

'सकाळ' च्या पाठपुराव्याला यश
नेर मंडळात गेल्या दोन वर्षापूर्वी अवकाळी पावसामुळे फळ बागासह इतर पिकांचे नुकसान झाले होते. या पार्श्वभूमीवर 'सकाळ' च्या माध्यमाने हवामान केंद्राबाबत पाठपुरावा करण्यात आला होता. त्यात यश येऊन येथे हवामान केंद्र मंजूर करण्यात आले आहे. यामुळे परिसरातील शेतकर्यांनी 'सकाळ' चे आभार मानले आहेत. 

देऊर : धुळे जिल्ह्यातील 39 महसूल मंडळापैकी 38 मंडळांमध्ये स्वयंचलित हवामान केंद्रांची उभारणी नुकतीच महावेध प्रकल्पांतर्गत करण्यात आली आहे. यामुळे शेतकर्यांना कृषी विषयक सल्ला, पीक विमा, मार्गदर्शनासह हवामान क्षेत्रात संशोधनासाठी, आपत्ती व्यवस्थापनासाठी व इतर क्षेत्रामध्ये उपयोग होणार आहे.

जिल्ह्यात सातत्याने गेल्या वर्षापासून अवकाळी पाऊस, गारपीट,चक्रीवादळ, ढगाळ हवामानाने थैमान घातले होते. यामुळे डाळिंब बागासह, इतर फळपीक, पीकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.त्यात शेतकर्यांना हवामान विषयक माहिती मिळत नसे.
त्यात शेती पिकांचे नुकसान अधिक प्रमाणावर होत होते. अचूक माहिती पंचनामा करताना तलाठी, कृषी सहाय्यक यांना मिळत नसे. व खर्या  शेतकर्यांना लाभा पासून वंचित राहावे लागत असे.अशा विविध अडचणी येत होत्या. या यंत्रामुळे आता खरी माहिती समोर येणार आहे. बसविलेले हवामान यंत्राची शेतकर्यांनी माहिती घेणे आवश्यक आहे. कारण अद्यापही जिल्ह्यातील सर्व मंडळात शेतकर्यांना हे हवामान केंद्र आपल्या मंडळात कुठे आहे. हे माहिती नाही. शेतकर्यांना ही बाब लक्षात येण्यासाठी कृषी विभागाने जनजागृती मंडळात करावी.

काम कोणी घेतले आहे
महावेध प्रकल्पाची सार्वजनिक खासगी भागिदारीतून स्कायमेट वेदर सर्व्हिसेस प्रा.लि.ची सेवा पुरवठादार संस्था म्हणून निवड झाली आहे.सदर कंपनी शासनास
क्लाऊड सर्व्हरवर सात वर्षापर्यंत मोफत हवामान विषयक माहिती पुरविणार आहे. तसे शासनाचेच आदेश आहेत.त्या कालावधीत स्व खर्चाने हा प्रकल्प स्कायमेट वेदर सर्व्हिसेस कंपनी चालविणार आहे. बांधा - मालक व्हा. (बीओओ) तत्वावर ही अंमलबजावणी या प्रकल्पाची आहे.

हवामान केंद्राची माहिती कशी मिळेल
नैसर्गिक आपत्तीची पूर्वकल्पना दोन दिवस आधीच मिळणे शक्य होऊन, हवामानाचा अंदाज शेतकर्यांना मिळणार आहे. या स्वयंचलित यंत्रात पाच घटकांची माहिती मिळणार आहे. त्यात पॅरोमीटर बसविण्यात आले आहेत. त्याद्वारे -- तापमान, पर्जन्यमान, सापेक्ष आर्द्रता , (हवेचा)वार्याचा वेग, दिशा व हवामान.या हवामान विषयक घटकांची खरी वेळ माहिती प्रती दहा मिनिटांनी डेटा लाॅगर मध्ये नोंद द्यायाची आहे. नोंदविलेली माहिती सर्व्हरला दर एक तासाने पाठवायची आहे. या यंत्राद्वारे संकलित केली जाणारी माहिती कृषी विज्ञान केंद्र, कृषी विद्यापीठ व कृषी विभागाला प्राप्त होणार आहे. या यंत्रावर थेट सेटेलाईट द्वारे नियंत्रण राहणार आहे. 

'सकाळ' च्या पाठपुराव्याला यश
नेर मंडळात गेल्या दोन वर्षापूर्वी अवकाळी पावसामुळे फळ बागासह इतर पिकांचे नुकसान झाले होते. या पार्श्वभूमीवर 'सकाळ' च्या माध्यमाने हवामान केंद्राबाबत पाठपुरावा करण्यात आला होता. त्यात यश येऊन येथे हवामान केंद्र मंजूर करण्यात आले आहे. यामुळे परिसरातील शेतकर्यांनी 'सकाळ' चे आभार मानले आहेत. 

जिल्हयात या महसूल मंडळाच्या ठिकाणी बसविले यंत्र तालुकानिहाय-
धुळे - धुळे (कृषी विद्यालय), शिरूड, बोरकुंड, पुरमेपाडा, सोनगीर, नगाव, नवलनगर, पिंप्री, खेडे, कुसुंबा, देऊर खुर्द, लामकानी, 
साक्री- साक्री (तालुका बियाणे व रोपवाटिका),कासारे, वसमार, दुसाने, जैताणे, देवजीपाडा, पिंपळनेर, कुडाशी, उमरपाटा, कुरूसवाडे,
शिंदखेडा- शिंदखेडा (शहर- तालुका बियाणे फार्म)चिमठाणे, देगाव, खलाणे, गोराणे, बेटावद, वर्षी, दोंडाईचा, विखरण, विरदेल,  
शिरपूर- शिरपूर (आमोदे तालुका बियाणे फार्म),बोराडी, अर्थे, वारूड, होळनांथे, थाळनेर, सांगवी.

Web Title: Dhule news weather information in dhule