धुळे: एकजूट महिलांच्या विक्रमी आंदोलनानंतर बिअरबार जमीनदोस्त

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 18 जुलै 2017

धुळे: शहरातील नकाणे रोडवरील वादग्रस्त अतिक्रमित हॉटेल कुणाल परमीटरूम व बिअरबार महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाने आज (मंगळवार) सकाळी जमीनदोस्त केले.

या अतिक्रमित बिअरबार संदर्भात आमदार अनिल गोटे यांच्या पुढाकाराने उत्पादन शुल्क विभागाचे मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे आज दुपारी तीनला बैठक होणार आहे. तत्पूर्वीच, अनेक महिने अतिक्रमित हॉटेल कुणाल बिअरबारला अभय देणाऱ्या महापालिकेला मंत्र्याकडील बैठकीपूर्वी हॉटेल कारवाई करणे भाग पडले.

सर्वोच्च न्यायालयाच्या महामार्गावरील मद्य विक्रीच्या बंद आदेशानंतर अनेक व्यावसायिक कॉलनी भागामध्ये दुकान किंवा हॉटेल स्थलांतरित करण्याचा प्रयत्न करीत आहेत. अशात प्रभाग सहामध्ये नकाणे रोडलगत प्रमोदनगर सेक्‍टर दोनमध्ये पूर्वीपासून असलेला कुणाल बिअरबार आणि त्यालगत साक्री रोडवरून स्थलांतरित होऊन आलेले प्रिन्स वाइन शॉपवर मद्यपींची गर्दी उसळायला लागली. परिणामी प्रमोदनगरमधील विद्यार्थी, विद्यार्थिनी, महिलांना अनेक समस्या भेडसावू लागल्या. सामाजिक शांततेसह कायदा व सुव्यवस्था धोक्‍यात येईल, अशी स्थिती निर्माण होऊ लागली. शांत आणि महिलांसाठी सुरक्षित असलेला हा भाग हॉटेल व मद्य दुकानामुळे, मद्यपिंमुळे महिलांना अडचणींचा ठरू लागला. या स्थितीकडे अधिकारी दुर्लक्ष करीत असल्यामुळे रहिवाशांमध्ये असंतोष निर्माण झाला आणि त्यातून एकजूटीतून दारू दुकान व हॉटेल हटाव लढा महिलांनी उभा केला. नगरसेवक कमलेश देवरे, नगरसेविका वैभवी दुसाने आणि नगरसेविका प्रतिभा चौधरी यांच्या नेतृत्वाखाली सुरू झालेल्या लढ्यातील आंदोलनास सोमवारी 38 दिवस पूर्ण झाले. भर पावसात आणि कुठलाही खंड न पडू देता वादग्रस्त हॉटेल व दुकानाजवळ रोज सायंकाळी साडेसात ते रात्री साडेदहापर्यंत संबंधित नगरसेवकांसह मोठ्या संख्येने महिला, पुरुष, विद्यार्थ्यांनी भजन आंदोलनात सहभाग नोंदविला. त्यास अनेक संघटनांनी उत्स्फूर्तपणे पाठिंबा दिला.

आंदोलन सुरू असताना हॉटेल कुणाल अतिक्रमात असल्याचा मुद्दा पुढे आला. प्रत्यक्ष परवानगी दिलेल्या जागेवर बांधकाम न करता शासकीय जागेवर अतिक्रमीत बांधकाम झाल्याने महापालिकेने कुणाल बिअर बार जमीनदोस्त करण्याची कारवाई केली आहे.
प्रमोदनगरसह प्रभाग सहामधील आंदोलकांसह वंदेमातरम प्रतिष्ठान व  पाठबळ देणाऱ्या विविध संघटना, व्यक्तींचे हे यश मानले जात आहे. महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाने पोलिस बंदोबस्तात सकाळी साडेसहानंतर हॉटेल कुणाल जमीनदोस्त करण्याची कारवाई सुरू केली. प्रिन्स वाईनशॉप हटेपर्यंत लढा सुरू राहणार असल्याचे आंदोलकांनी सांगितले.

ई सकाळवरील ताज्या बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा :

Web Title: dhule news women and Beerbar rumble