धुळ्यात फटाके फोडण्याच्या वादातून युवकाचा खून

राम निकुंभ
शनिवार, 21 ऑक्टोबर 2017

मनमाड जीन परिसरात दिनेश प्रल्हाद चौधरी (वय 19) हा गुरूवारी रात्री नऊला फटाके फोडण्यासाठी चौकात आला. त्यावेळी तुषार शिंदे, भैय्या सरोदे व साथीदारांनी दिनेशशी वाद घातला. यात चौघांनी दिनेशला घेरले आणि त्याच्यावर गुप्तीसह तिक्ष्ण हत्यारांनी वार केले. या हल्ल्यात दिनेशचा जागीच मृत्यू झाला. 

धुळे : शहरातील मनमाड जीन परिसरात फटाके फोडण्यावरून झालेल्या वादात एका युककाचा खून झाला. या घटनेत दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. गुंड गुड्ड्याच्या हत्याकांडाची घटना ताजी असतानाच शहरात पुन्हा खूनाची घटना घडल्याने भितीचे वातावरण पसरले आहे.

मनमाड जीन परिसरात दिनेश प्रल्हाद चौधरी (वय 19) हा गुरूवारी रात्री नऊला फटाके फोडण्यासाठी चौकात आला. त्यावेळी तुषार शिंदे, भैय्या सरोदे व साथीदारांनी दिनेशशी वाद घातला. यात चौघांनी दिनेशला घेरले आणि त्याच्यावर गुप्तीसह तिक्ष्ण हत्यारांनी वार केले. या हल्ल्यात दिनेशचा जागीच मृत्यू झाला. 

दरम्यान, घटनास्थळी दिनेशवर हल्ला करणा-यांनाही मारहाण करण्यात आली. यात शिंदे आणि सरोदे गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी जिल्हा सर्वोपचार रूग्णालयात दाखल करण्यात आले. खूनाच्या घटनेतील अन्य दोन आरोपी फरार झाले असून त्यांचा पोलीस  शोध घेत आहेत. सर्व आरोपी अल्पवयीन असल्याचे सांगण्यात आले. या घटनेमुळे दिवाळीत मनमाड जीन परिसरात भितीचे वातावरण आहे. या भागात पोलीस बंदोबस्त असल्याने शांतता आहे. या प्रकरणी आझादनगर पोलिसात अद्याप गुन्हा दाखल झालेला नाही.

Web Title: Dhule news youth murder in Dhule