तीन लाख देवूनही नोकरी न मिळाल्याने आत्महत्या

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 6 जून 2017

धुळे - नोकरीपोटी दिलेले तीन लाख रुपयेही गेले अन नोकरीही न मिळाल्याने खचलेल्या तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली. वलवाडी (ता. धुळे) येथील पिता-पुत्राविरूध्द याप्रकरणी देवपूर पोलिस ठाण्यात काल (ता.4) रात्री उशिरा आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल झाला.

देवपूरमधील विष्णूनगरमधील रोहित मैकूलाल माधवे (वय 35, रा. संत रोहिदास गार्डनजवळ) हा पत्नीसह राहतो. त्याला महापालिकेत सफाई कामगार म्हणून नोकरीस लावण्याचे आमिष शाळिग्राम विष्णू सोनवणे, बाळकृष्ण शाळिग्राम सोनवणे (दोघे रा. वलवाडी) यांनी दाखविले. त्यासाठी तीन लाख रुपयेही काही महिन्यांपूर्वी घेतले होते. बरेच दिवस होऊनही नोकरीस लावून न देता टाळाटाळ केली. नोकरीसाठी दिलेल्या पैशांची मागणी रोहित माधवे याने केली. परंतु पैसेही परत न मिळाल्याने रोहितने मनस्ताप करीत गळफास घेऊन आत्महत्या केली. तशा आशयाची फिर्याद रोहितची पत्नी संगीता रोहित माधवे यांनी दिली. त्यानुसार संशयित शाळिग्राम सोनवणे, बाळकृष्ण सोनवणे पितापुत्राविरूध्द आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी देवपूर पोलिस ठाण्यात काल रात्री उशिरा गुन्हा दाखल झाला. निरीक्षक के. बी. शिरसाट यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक बी. ओ. सोनवणे तपास करीत आहेत.

Web Title: dhule news youth suicide