धुळे जिल्हा परिषदेत 169 प्राथमिक शिक्षक हजर

Dhule ZP
Dhule ZP

धुळे : धुळे जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातर्फे नुकतीच आंतरजिल्हा बदली प्रकिया राबवली गेली. त्यात धुळे जिल्ह्यात 208 प्राथमिक शिक्षकांपैकी 169 प्राथमिक शिक्षक काल (शनिवार) पर्यंत जिल्हास्तरावर हजर झाले आहेत.

उर्वरित 39 शिक्षक प्रशासकीय कारणास्तव उशीराने हजर होण्याची शक्यता आहे. साधारणतः 190 प्राथमिक शिक्षक हजर होतील. आता या हजर झालेल्या शिक्षकांना पदस्थापनेची प्रतिक्षा लागून आहे. आपली पदस्थापना लवकर मिळावी; यासाठी हजर झालेले शिक्षक समुपदेशन कॅम्प केव्हा होतो याकडे लक्ष ठेवून आहेत. आपसी बदलीने पाच प्राथमिक शिक्षक हजर झाले आहेत. तर एका शिक्षकाची बदली रद्द झाली आहे. आंतरजिल्हा बदलीचा पदस्थापना कॅम्प हा नऊ जुलै ला होणार होता. मात्र पंचायत राज समिती दौरा व काही प्रशासकीय कारणास्तव हा कॅम्प पुढे ढकलण्यात आला आहे.

मात्र लवकरच या आठवडाभरात हा समुपदेशन पदस्थापना कॅम्प होईल. असे अंतर्गत गोटातून समजते. नऊ जुलै पर्यंत बहुतांश शिक्षक धुळे जिल्हा परिषदेला हजर झाले नव्हते. मात्र मंत्रालयीन स्तरावरून सचिवांनी ऑनलाईन मेल सर्व जिल्हा परिषदांना पाठवून कार्यमुक्ती संदर्भात हालचाली गतीमान झाल्या. यंदा नंदुरबार जिल्हयात शिक्षकांना कार्यमुक्ती साठी संघर्ष करावा लागला आहे. तालुकास्तरावर नंदुरबारच्या शिक्षकांना वेठीस धरण्याचा प्रकार यावेळी घडला. तात्काळ सचिवांच्या आदेशाने मात्र पुनरावृत्ती टळली आहे. अन्यथा या शिक्षकांना शैक्षणिक वर्ष सुटण्यावरच यावे लागणार होते. असे काही शिक्षकांनी नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले. मात्र पालघर , रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यातून शिक्षकांना येण्यास उशीर होणार आहे. असे वरिष्ठ स्तरावरून चर्चेत सांगण्यात आले आहे.

रिक्त गाव-शाळा शोधण्याचा सर्व्हे सुरू
आपसी बदली शिक्षकांना शाळा मिळाल्याचे समजते. आता पदस्थापना देताना सेवाजेष्ठते नुसार ऑनलाईन पद्धतीने स्क्रीन वर शाळा दिल्या जातील. त्यामुळे धुळे, साक्री, शिरपूर, शिंदखेडा तालुक्यातील कोणत्या शाळा रिक्त आहेत. त्यांचा शोध बदली पात्र शिक्षकांकडून घेणे सुरू आहे. त्याचबरोबर उपद्व्यापी गाव नको म्हणून ती शाळा घेण्यास नकारघंटा येऊ शकते. यासह सर्व गणित पात्र शिक्षक शैक्षणिक पटलावर मांडत आहे. त्यामुळे कोण कोणत्या तालुक्यात जाते यावर सर्व गणित अंवलंबून आहे.

यावर्षी नव्यानेच राज्यभरात ऑनलाईन आंतरजिल्हा बदल्या
जिल्हा परिषदेच्या शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदली प्रक्रिया शासनाने 
 धोरण निश्चित केले आहे. त्यानुसार आंतरजिल्हा बदली साठी इच्छुक प्राथमिक शिक्षकांनी गटशिक्षणाधिकारी कार्यालयात ऑनलाईन अर्ज भरून प्रस्ताव सादर केले. यामुळे कामकाजात पारदर्शकता आली आहे.

रिक्त गावांतील शाळांचा प्रश्न सुटणार
सध्या जिल्ह्यातील रिक्त असलेल्या गावातील जिल्हा परिषद शाळांचा प्रश्न सुटणार आहे.बहुतांश ठिकाणी जिल्हा परिषद शाळेला ग्रामस्थांनी कुलूप ठोकण्याचा प्रकार घडला आहे. त्या पारश्वभूमीवर आंतरजिल्हा बदली ने आलेल्या शिक्षकांना रिक्त शाळेवर पदस्थापना दिली जाईल. त्यामुळे विद्यार्थी गुणोत्तर प्रमाणात शिक्षक मिळतील. यंदा ही नंदुरबार जिल्ह्यातून सर्वाधिक आतापर्यंत 87 शिक्षक हजर झाले आहेत. त्यानंतर औरंगाबाद हून 26; जळगावहून 21 शिक्षक आले आहेत.

पदस्थापनेला पुरावा आणावा
पदस्थापना देण्या दिवशी संबंधित लाभार्थी शिक्षकांनी अपंग, विधवा, परितक्त्या, पती- पत्नी एकत्रीकरण, विशेष संवर्गातील शिक्षकांनी आपले पुरावे मूळ कागदपत्रे घेऊन सोबत आणावीत.

स्वजिल्ह्यात येणारे शिक्षक--208
जिल्हानिहाय हजर झालेले शिक्षक-- 169
परभणी-1, अहमदनगर-4, औरंगाबाद-26,जालना-2, जळगाव-21, बुलढाणा-1, बीड-6, सोलापूर-4, सातारा-1, हिंगोली-1, नाशिक-9, नंदुरबार- 87, नांदेड-2, ठाणे-1, कोल्हापुर-3.
उर्वरित येणारे शिक्षक संख्या - 39
आपसी बदली ने हजर शिक्षक - 5  
त्यात इतर मागासवर्गीय - 2,
खुला-2, अनु.जाती -1
उशीराने हजर होतील असे शिक्षक -12
रद्द बदली - 1
अंदाजित हजर  होणारे शिक्षक -190

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com