दोनशे रुपये देऊन करत होते अश्लील चाळे

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 2 जुलै 2019

दोनशे रुपये प्रतितास याप्रमाणे पैसे घेऊन जोडप्यांना विशिष्ट जागा देण्यात येत होती. या ठिकाणी ही जोडपी अश्लील चाळे करत होती.

धुळे: शहरातील ज्योती चित्रपटगृहामध्ये दोनशे रुपये प्रतितास देऊन प्रवेश करत व आतमध्ये गेल्यानंतर अश्लील चाळे करत बसत. याबद्दलची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर छापा टाकून 10 युवक व युवतींना अटक करण्यात आली आहे. या प्रकारामुळे शहरात खळबळ उडाली आहे.

धुळे पोलिसांच्या दामिनी पथकाने ज्योती चित्रपटगृहात छापा टाकला. यावेळी अश्लील चाळे करताना 10 जोडप्यांना रंगेहाथ पकडण्यात आले. छाप्याची कारवाई सुरु असताना 16 पैकी 10 जणांना पोलिसांनी अटक केली तर सहा जोडपी गर्दीचा फायदा घेत पसार झाले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, धुळे शहरातील ज्योती चित्रपटगृहातील बॉक्समध्ये दोनशे रुपये प्रतितास याप्रमाणे पैसे घेऊन जोडप्यांना विशिष्ट जागा देण्यात येत होती. या ठिकाणी ही जोडपी अश्लील चाळे करत होती. याबद्दलची माहिती पोलिसांच्या दामिनी पथकाला मिळाल्यानंतर कारवाई करण्यात आली. दामिनी पथकातील एक महिला आणि पुरुष पोलिसाने साध्या वेश परिधान केल्यानंतर नकली जोडपे बनून चित्रपटगृहात प्रवेश केला. चित्रपटगृहात गेल्यावर मिळालेल्या माहितीची खातरजमा केली असता चित्रपट गृहातील बॉक्समध्ये काही जोडपी अश्लील चाळे करत असल्याचे आढळून आलं. पोलिसांनी तत्काळ कारवाई करत दहा जोडप्यांना ताब्यात घेतले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Dhule Police Damini squad take action on Couple making out in Jyoti Theater