धुळे जिल्हा परीषदेच्या डिजिटल शाळांची चाचपणी

zp school
zp school

कापडणे (ता. धुळे) : धुळे जिल्हा परीषदेच्या शाळा गेल्या तीन वर्षांत शंभर टक्के डिजिटल झाल्या आहेत. यासाठी शिक्षक, अधिकार्‍यांचे प्रयत्न आणि ग्रामस्थांची लोकवर्गणी यामुळे जिल्हा राज्यात माॅडेल ठरला. पण...डिजिटल वर्गाचा वापर किती झाला याची चाचपणी शासकिय स्तरावर झालेली नाही.

एका कंपनीने वेगळ्याच माहितीसाठी डाटा गोळा केला. अन त्यात डिजिटलचा वापर किती कमी प्रमाणात झाला आहे. ही माहिती अनायसे पुढे आली आहे. डिजिटल शाळा हा फुसका बार ठरत असल्याचे पुढे आले आहे. याबाबतीत संबंधितांनी लक्ष घालण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

डिजिटल शाळांमध्ये प्रोजेक्टर अथवा अॅन्र्डाईड टीव्हीचा वापर करुन शाळा डिजिटल झाल्यात. राज्यात धुळे माॅडेल ठरला. पण नव्याचे नऊ दिवस संपलेत. प्रोजेक्टरचा वापर शाळांवर जुजबी होवू लागला आहे. एका कंपनीने (नाव न प्रसिध्द करण्याच्या अटीवर) त्यांनी पुरविलेल्या प्रोजेक्टरची वार्षिक तपासणी करणे सुरु केले आहे. त्यातून ही माहिती पुढे आली आहे.

त्या दहा शाळांवर दीड लाख खर्च
जिल्हा परीषदेच्या शिक्षण विभागातर्फे जिल्ह्यातील कापडणेसह दहा शाळांवर प्रत्येकी दीड लाखाचा खर्च करुन इम्पोर्टेड कंपनीचे व्हीडीओ प्रोजेक्टर बसविण्यात आलेले आहेत. या शाळांमध्ये डिजिटलचा जुजबी वापर झाला आहे.  2016-17 व 2017-18 या दोन वर्षांत  प्रोजेक्टर लर्निग अवरर्सची केवळ सरासरी दीडशे ते दोनशे तासिका वापारल्या गेल्या आहेत. प्रत्येक प्रोजेक्टरमधून लर्निग अवरर्सची मोजणी करण्याची मागणी जाणकारांमधुन होत आहे.

ग्रामस्थांची लाखमोलाची लोकवर्गणी
प्रत्येक गावातील नागरिकांनी शाळेची गुणवत्ता वाढण्यासाठी शंभर पासून तर काही हजारांपर्यंतची देणगी दिली. त्यातून डिजिटल शाळेसह रंगरंगोटीही केली. शिक्षकांनी भिंती बोलक्या केल्यात. शिक्षकांनीही यासाठी विशेष मेहनत घेतली. प्रत्येक वर्ग  शिक्षकाने दररोज अर्धा तास वापर केला. तर चार शिक्षक मिळून दोन तास वापर होईल. वार्षिक सरासरी चारशेपेक्षा अधिक तास वापर होणार आहे. मात्र दोन तीन वर्षांतील वापर एवढा कमी आहे कि ही डिजिटल यंत्रणा धुळेखातच पडून आहे. डिजिटल वर्गात शिक्षक विद्यार्थी घेवून जात नाहीत. अभ्यासक्रमसह पाठ्यक्रम अपडेट ठेवत नाहीत. सध्या तर शाळा उघडून दोन महिने झाले आहेत. तरीही बर्‍याच शाळांचे डिजिटल वर्ग बंदच आहेत. काही मुख्याध्यापकांनी ऊन्हाळी सुटीत प्रोजेक्टर घरी नेले आहे. तेही अद्याप शाळेत परत अालेले नाही.  डिजिटल शाळा एक फार्स ठरत आहे.

कापडणे येथील दोन शाळांनी गेल्या दोन वर्षांत वापरलेले प्रोजेक्टरच्या तासिका पुढीलप्रमाणे :
जिल्हा परीषद शाळा क्रमांक एक कापडणे  : 248 तास
जिल्हा परीषद शाळा क्रमांक दोन कापडणे 2 :  220
जिल्ह्यातील निम्मेपेक्षा अधिक शाळांचा प्रोजेक्टरचा वापर हा पन्नास तासांपेक्षा कमी  आहे.

दरम्यान हे चित्र प्रातिनिधीक स्वरुपात पुढे आले आहे. मात्र निकुंभे, घाणेगाव, सावळदे, मांडळ अशा काही माॅडेल शाळांमध्ये व्हीडीओ प्रोजेक्टरचा वापर प्रत्येक दिवशी किमान दोन तास आहे. इतरत्र मात्र शिक्षकांनी वापर वाढविणे आवश्यकच आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com