चोपड्याच्या दिनेश साळुंखेंची पुन्हा विदेशवारी

दिनेश साळुंखे
दिनेश साळुंखे

गणपूर (ता. चोपडा) - दोंडवाडे (ता. चोपडा) येथील रहिवासी दिनेश मधुकर साळुंखे येत्या १ ते ६ नोव्हेंबर दरम्यान थायलंडमध्ये होणाऱ्या आंतरराष्ट्रीय हार्मोनी पपेट फेस्टिव्हल २०१८ मध्ये आपली कळसूत्री बाहुल्यांची कला सादर करणार आहेत. यापूर्वीही त्यांनी अनेक देशांमध्ये सादरीकरण केले आहे.

आजच्या संगणक युगात नवनवीन कला उदयास येत असल्या तरी प्राचीन कला मात्र लोप पावण्याच्या मार्गावर आहेत. अशाच एका कलेचे जतन व प्रसार करणारे चोपडा येथील शिक्षणशास्त्र विद्यालयातील कलाध्यापक असलेले दिनेश साळुंखे करीत आहेत. श्री. साळुंखे यांनी गेल्या अठरा वर्षापासून ही कला जोपासली असून कळपुतली नृत्याद्वारे मनोरंजनासह समाज प्रबोधनाचे कार्य ते करत आहेत. २०१४ मध्ये सोनी चॅनलवरील एन्टरटेंनमेंट के लिए कुछ भी करेगा या कार्यक्रमात सहभाग नोंदवून बक्षीस मिळविले आहे. सप्टेंबर २०१६ मध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावरील पोलंड येथील वर्ल्ड पपेट कार्निव्हल मध्ये त्यांनी भारताचे प्रतिनिधित्व केले होते, हे विशेष!
खानदेशी पुत्राची ही गगनभरारी आता सातासमुद्रापरी गेली असली तरी त्यामागे खर्च, वेळ यासाठीची त्यांची जिद्द विसरून चालणार नाही अशीच आहे. थायलंड मधील फुकेट मध्ये होणाऱ्या आंतरराष्ट्रीय हार्मोनी पपेट फेस्टीव्हलसाठी त्यांच्यासोबत भारतातून जगविख्यात शब्दभ्रमर कार रामदास पाध्ये व सत्यजित पाध्ये हे ही उपस्थित राहणार असले तरी साळुंखे हे तेथे हजेरी लावणारे भारतातील एकमेव सोलो परफॉर्मर आहेत. या फेस्टिव्हलसाठी जगभरातील कलावंत १ ते ६ नोव्हेंबर दरम्यान आपली कला सादर करणार असून दिनेश साळुंखे ३ नोव्हेंबरला त्यांची कला मराठी, हिंदी व गुजराथी गाण्यांवर ६ ते ७ कठपुतल्यांचा वापर करून सादर करणार आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावर कला सादर करण्याची त्यांची ही दुसरी संधी आहे. 
या विदेशवारीसाठी त्यांना गौरव महाले, नंदकिशोर देशमुख, भय्या पवार, रविकांत मगरे, ए. पी. पाटील, अभिषेक शुक्‍ल, प्रकाश देशमुख यांनी आर्थिक मदत केली असून प्राचार्य राजेंद्र महाजन, ॲड. संदीप पाटील यांचे त्यांना मार्गदर्शन लाभले.

थायलंडमध्ये रशिया, ब्राझील, इजिप्त, मॅनमार, सिंगापूर, थायलंड, फ्रांस, बांगलादेश, अर्जेन्टीना, अल्बानिया, बल्गेरिया, स्पेन, श्रीलंका, कोरिया आदी देशातील कलावंत सहभागी होतील. त्यांच्यासमवेत आंतरराष्ट्रीय स्तरावर आपणही कला सादर करून भारताचे शान राखू. 
- दिनेश साळुंखे, कलाध्यापक, चोपडा 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com