पोलिस महासंचालक पदकांमध्ये जळगाव अव्वल 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 27 एप्रिल 2017

जळगाव - जिल्हा पोलिस दलात सेवा बजावत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या 18 पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांना महाराष्ट्र राज्य पोलिस महासंचालक मुंबई यांनी सन्मानचिन्ह जाहीर केले आहे. संपूर्ण महाराष्ट्रात 740 पदकांत सर्वाधिक पदके जळगाव जिल्ह्यास प्राप्त झाली असून याबद्दल पोलिस अधीक्षक डॉ. जालिंदर सुपेकर यांचे पोलिस महानिरीक्षक विनयकुमार चौबे यांनी अभिनंदन केले आहे. पुरस्कार प्राप्त अधिकारी कर्मचाऱ्यांना 1 मेस पोलिस मुख्यालयाच्या मैदानावर होणाऱ्या कार्यक्रमाप्रसंगी सन्मानचिन्ह देवून सन्मानित करण्यात येणार आहे. 

जिल्हा पोलिस दलात कार्यरत असलेल्या 15 कर्मचारी व तीन अधिकाऱ्यांना महासंचालक पदक आज संध्याकाळी घोषित करण्यात आले. सेवेदरम्यान उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचे सन 2016 साठीचे प्रस्ताव पोलिस अधीक्षकांनी महाराष्ट्र राज्य पोलिस महासंचालक मुंबई यांच्याकडे प्रस्ताव पाठविले होते. त्यावर बुधवारी पोलिस महासंचालकांनी शिक्कामोर्तब केले असून 18 अधिकारी व कर्मचाऱ्यांना सन्मानचिन्ह देऊन 1 मेस आयोजित समारंभात या पदकांनी सन्मानित करण्यात येणार आहे. 

यांचा होणार सन्मान 
सन्मानचिन्ह प्राप्त करणाऱ्यांमध्ये पोलिस उपनिरीक्षक ईश्‍वर जगन्नाथ सोनवणे, दिलीप विठोबा पाटील, विजय श्रीकृष्ण बोत्रे, एएसआय रवींद्र बळिराम सपकाळे, जयवंत संतोष पाटील, अरुण वामनराव पाटील, हेडकॉन्स्टेबल दिनेशसिंह लोटू पाटील, तुकाराम शिवाजी निंबाळकर, सुनील श्‍यामकांत पाटील, शेख मकसूद बशीर, प्रदीप राजाराम चिरमाडे, राजेंद्र हंसराज पवार, नरेंद्र लोटन वारुळे, प्रदीप वसंतराव पाटील, सुनील बाबूराव पाटील, जयवंत भानुदास चौधरी, जमील अहमद हमीदखान यांचा समावेश आहे. 

जिल्हा पोलिस दलास अठरा पदकांचा बहुमान मिळणे पोलिसदलासाठी गौरवास्पद बाब आहे. इतक्‍या मोठ्या संख्येने जिल्हा पोलिस दलास पदक मिळण्याचा हा बहुधा पहिलाच अनुभव आहे. कर्मचाऱ्यांनी केलेल्या उत्कृष्ट कार्याचा व कर्तव्यनिष्ठेचा हा सन्मान असून केवळ पदक मिळालेल्याच कर्मचाऱ्यांचा नव्हे तर संपूर्ण पोलिसदलाचा हा सन्मान आहे. 
- डॉ. जालिंदर सुपेकर, जिल्हा पोलिस अधीक्षक 

Web Title: Director General of Police, Jalgaon tops