"बीएस- तीन' वाहनाच्या खरेदीसाठी कंपन्यांची सवलत 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 31 मार्च 2017

नाशिक - भारत स्टेज- तीन (बीएस- तीन) वाहनांच्या विक्री व नोंदणीवर सर्वोच्च न्यायालयाने 1 एप्रिलपासून बंदी घातल्याने आज संबंधित कंपनीने नव्या कोऱ्या वाहनांच्या विक्रीसाठी सवलती दिल्या. दोन दिवसांनी कालबाह्य ठरणारी वाहने सवलतीत विकली. त्यामुळे स्वस्तातील वाहनांसाठी गर्दी होती. 

नाशिक - भारत स्टेज- तीन (बीएस- तीन) वाहनांच्या विक्री व नोंदणीवर सर्वोच्च न्यायालयाने 1 एप्रिलपासून बंदी घातल्याने आज संबंधित कंपनीने नव्या कोऱ्या वाहनांच्या विक्रीसाठी सवलती दिल्या. दोन दिवसांनी कालबाह्य ठरणारी वाहने सवलतीत विकली. त्यामुळे स्वस्तातील वाहनांसाठी गर्दी होती. 

भारतात येत्या 1 एप्रिलपासून बीएस- चार उत्सर्जन मानकांची अंमलबजावणी होणार आहे. त्यामुळे बीएस- तीनची आठ लाखांहून अधिक वाहने दोन दिवसांनंतर कालबाह्य ठरणार आहेत. साहजिकच, दोन दिवसांनंतर कालबाह्य ठरणारी वाहने स्क्रॅपमध्ये भंगार ठरणार असल्याने उत्पादक कंपन्यांनी अखेरच्या दोन दिवसांत मिळेल तेवढे पैसे मोकळे करण्यावर भर दिला. वाहन वितरकांनी आज त्यासाठी सवलतीचा वर्षाव केला. साधारण पाच ते 12 हजारांपर्यंत कमी किमतीत ग्राहकांना वाहने उपलब्ध करून दिली. दोन दिवसांत प्रादेशिक परिवहन विभागाकडे कर भरून नोंदणी करून घेत, लाभ देण्याच्या उपक्रमाला काही प्रमाणात प्रतिसादही लाभला. 

दुचाकीला प्राधान्य 
गरजू आणि विशेषतः महिलांच्या स्कूटर आणि महाविद्यालयीन युवकांच्या दुचाकीला प्रतिसाद मिळाला. यंदा मुलांसाठी वाहन घ्यायचेच, असे नियोजन असलेल्यांनी आज संधी साधली. 1 एप्रिलपासून वाहनांच्या नोंदणीला तसेच विक्रीला बंदी असली, तरी 31 मार्चपर्यंत वाहनांची विक्री वैध ठरत असल्याने मिळेल तेवढे पैसे मोकळे करून घेण्याचा वाहन कंपन्यांचा आटापिटा सुरू होता. अधिकाधिक सवलत मिळविण्यासाठी अनेक ठिकाणी भावातील घासाघीस सुरू होती. 

वाहनाचा प्रकार कॅश बॅक अतिरिक्त लाभ 
स्प्लेंडर 5,000 विमा फुकट 
सर्व दुचाकी 7,500 विमा फुकट 
स्कूटर सीरिज 12,500 विमा फुकट 

Web Title: Discounts vehicle companies for the purchase of BSE-three