दावे लोकसभेचे, चर्चा विधानसभेची अन् धसका वंचित आघाडीचा..!

yeola
yeola

येवला : राष्ट्रवादीवाल्याचा पंधरा हजारापर्यंत तर शिवसेना-भाजपाला पंचवीस हजाराच्या मताधिक्याचा विश्वास. पण यापेक्षाही वंचित आघाडीने दिलेला धक्का अन राजकीय चित्र बदलत असल्याने येणाऱ्या विधानसभेततही काय होईल यावर खमंग चर्चा सर्वपपक्षीय नेत्यांत रंगली..या सगळ्या चर्चेत मात्र वंचित आघाडी धसका सगळ्यांनीच घेतल्याचे जाणून आले.

या एकत्रित चर्चेसाठी निमित्त ठरले ते येवला प्रतिष्ठानच्यावतीने आयोजित मिसळ पार्टीचे..येथील हॉटेल साईराज येथे आयोजित केलेल्या या पार्टीत येथील प्रसिद्ध मिसळ,ढोकळा,दहीवडयावर नेत्यांसह पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी ताव मारला पण त्याच वेळी रंगलेल्या गप्पा ही लक्षवेधी ठरल्या. राष्ट्रवादीचे नेते माणिकराव शिंदे यांनी भांडणारे व भांडायला लावणारे नेते एकत्र आल्यावर कार्यकर्त्यांची कशी गोची होते याचे एक उदाहरण सांगून नेत्यांप्रमाणेच कार्यकर्त्यांनी एकोपा जपावा असा संदेश दिला. याच वेळी शिक्षक आमदार किशोर दराडे यांनीही सर्वांनी असा एकोपा ठेवला तर तालुक्याच्या विकासाला नक्कीच एकत्रित ताकत लावता येईल असा सल्ला दिला. शिंदे यांनी यावेळी वंचित आघाडीमुळे राष्ट्रवादीला फटका बसल्याचे मान्य केले.पण या मतदारसंघातून पंधरा हजारापर्यंत मताधिक्याचा दावा त्यांनी केला तर आमदार दराडे व शिवसेनेचे नेते संभाजी पवार,भाजपाचे बाबा डमाळे यांनी मात्र युतीच्या उमेदवाराला २५ हजारांपर्यंत मताधिक्याचा दावा केला.यावेळी आमदार दराडे यांनी मात्र मी अपक्ष असल्याने मला पक्षीय भानगडीत ओढू नका अशी गुगली टाकली. 

या निवडणुकीत १८ ते ३५ वयोगटातील तरुण कोणाचेही ऐकण्याच्या मनस्थितीत नसल्याचे जाणवल्याचे अनेकांनी मान्य केले. त्याचवेळी आगामी विधानसभा निवडणुकीत वंचित आघाडीसह बदलते राजकारण तापदायक ठरेल याच्यावरही चर्चा रंगली. येथील हवामान तज्ञ अविनाश पाटील यांनी राबविलेल्या उपक्रमाचे कौतुक करत असे उपक्रम राबविण्याची सूचना मांडली. या

वेळी शिक्षक आमदार किशोर दराडे,राष्ट्रवादीचे प्रांतिक सरचिटणीस माणिकराव शिंदे, शिवसेना नेते संभाजी पवार,भाजपाचे बाबासाहेब डमाळे,जि.प.सदस्य संजय बनकर,शिवसेना शहरप्रमुख राजेंद्र लोणारी, तालुकाप्रमुख रतन बोरणारे,भाजपा शहरअध्यक्ष आनंद शिंदे,साहेबराव सईद,सुनिल पैठणकर,दिनेश आव्हाड,संजय सोमासे,नाना लहरे,आल्केश कासलीवाल,राहुल लोणारी,उद्योजक बाळासाहेब कापसे,धिरज परदेशी,दिनेश परदेशी, दिनेश राऊत,अमित अनकाईकर,प्रताप दाभाडे,विनोद पाटील,सचिन सोनवणे,प्रमोद शिंदे,योगेश सोनवणे,विजय गोसावी, गितेश गुजराथी,प्रशांत शिंदे,सुनिल ठोंबरे,मयूर कायस्थ,दिपक भदाणे,झुंजार देशमुख,अझर शहा,नितीन जाधव, सोमनाथ राऊत,किरण परदेशी,राकेश गिरासे,संतोष बटाव,समाधान बेलदार,संदिप बेलदार,विक्रम पवार,यमाबापु जाधव, संजय वाळुंज,संजय शिंदे आदि उपस्थित होते.बंडुनाना शिंदे यांनी आभार मानले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com