भारतातील एक कोटी "टीबी' रूग्णांबाबत न्यूर्याकमध्ये चिंतन 

wankhedkar
wankhedkar

धुळे : जगभरात चार कोटी आणि त्यात भारतातील एक कोटी "टीबी'चे रुग्ण "मिसिंग' आहेत. त्यांचे "रिपोर्टींग' होत नसल्याने आणि या आजारावर नियंत्रणासाठी नेमक्‍या काय उपाययोजना कराव्या लागतील यावर विचारविनिमयासाठी न्यूयॉर्क येथे 26 सप्टेंबरला युनायटेड नेशन्सची असेंब्ली होत आहे. त्यात भारताचे प्रतिनिधित्व करणार असल्याची माहिती "आयएमए'चे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. रवी वानखेडकर यांनी दिली. 

जागतिक पातळीवर भेडसावणाऱ्या विविध विषयांवर चर्चेसाठी दरवर्षी युनायटेड नेशन असेंब्ली होते. त्यात सर्वच राष्ट्रप्रमुख, नामांकित स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी सहभागी होतात. यंदा प्रथमच "टीबी'सारख्या आजारावर युनायटेड नेशन असेंब्लीमध्ये चर्चा होणार असल्याचे इंडियन मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. रवी वानखेडकर यांनी सांगितले. ते म्हणाले, की "एचआयव्ही', पोलिओ यासारखे विषय जागतिक आरोग्य संघटनेच्या (डब्लूएचओ) पातळीवर हाताळले जात असतात. इतर फोरमवर अशा आजारांवर चर्चा होते. त्यामुळे युनायटेड नेशनने जागतिक पातळीवर गंभीर स्वरूप धारण करणाऱ्या "टीबी' आजारावर उपाययोजनांसाठी पुढाकार घेतला आहे. जगात "टीबी'चे चार कोटी, तर त्यात भारतात एक कोटी रुग्ण असूनही त्यांचे "रिपोर्टींग'च होत नसल्याने चिंता व्यक्त होत असताना युनायटेड नेशनने भारतावर विशेष लक्ष केंद्रित केले आहे. 

जगभरातील अशा रुग्णांचा शोध घेऊन इलाज करण्यासाठी नेमक्‍या काय उपाययोजना कराव्या लागतील, यासाठी युनायटेड नेशनच्या असेंब्लीमध्ये विचारमंथन होईल. "टीबी'चा प्रश्‍न गांभीर्याने हाताळला जावा म्हणून युनायटेड नेशनने जूनपासून पूर्वतयारी सुरू केली. त्यासाठी विविध स्वयंसेवी संस्थांना "प्रेझेंटेशन' सादर करण्यास सांगितले. यानंतर जगभरातून शंभर स्वयंसेवी संस्थांच्या प्रतिनिधींनी असेमब्लीसाठी निवड झाली. त्यात भारताचे "आयएमए'तर्फे मी प्रतिनिधित्व करणार असल्याचे डॉ. वानखेडकर यांनी नमूद केले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com