मराठा समाजाच्या समितीशी आठवडाभरात चर्चा - पाटील 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 22 एप्रिल 2017

जळगाव - गेल्या आठवड्यात मराठा समाजाच्या कोल्हापूर येथे झालेल्या गोलमेज परिषदेत मराठा आरक्षणासंदर्भात सरकारशी चर्चेची तयारी दर्शविण्यात आली आहे. त्यानुसार या परिषदेत नियुक्त समितीशी येत्या आठवडाभरात मुख्यमंत्री स्वत: आरक्षणाच्या मुद्यावर चर्चा करतील, अशी माहिती राज्याचे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज येथे दिली. 

पाटील म्हणाले, की मराठा आरक्षणाच्या विषयासंदर्भात सरकार अत्यंत गंभीर आहे. त्यादृष्टीने आमचे प्रयत्न सुरू आहेत. न्यायालयात आरक्षणाच्या संदर्भात बाजू मांडण्यासाठी वकिलांचे मोठे पथक कार्यरत असून, सुमारे 2700 पानांचे पुरावे सरकारने तयार केले आहेत. 

समाजाच्या मागण्यांबाबत राज्य सरकारने नेमकी कुणाशी चर्चा करावी. याबाबत संदिग्धता होती. मात्र सकल मराठा संघटनेने स्वतःहून राज्य सरकारशी चर्चा करण्याची तयारी दाखविल्याचे त्यांनी सांगितले. 

कर्जमाफीसाठी सरकार तयारी करतेय 
राज्यातील शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी सरकार अनुकूल आहे. कर्जमाफी लागू करण्यासाठी सरकार तयारी करत आहेत. मात्र केव्हा कर्जमाफी होईल हे सांगता येणार नाही. शेतकऱ्यांना उत्पादन खर्च कमीत कमी असावा किंवा उत्पादन खर्च असूच नये, यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे पाटील म्हणाले. 

Web Title: Discussion within a week with the Maratha community committee