बोर्डींग पासही नाही..फ्लाईटही रद्द आणि पैसेही वाया

nashik ozar airport 1.jpg
nashik ozar airport 1.jpg

नाशिक : दिपावलीच्या मुहूर्तावर सुरु झालेली नाशिक-पुणे सेवा सुरळीत होत नाही तोचं हैद्राबाद-नाशिक सेवेला ब्रेक मिळाला आहे. गेल्या दोन दिवसांपासून प्रवाशांना कुठलीही पुर्व सुचना न देता तसेच बोर्डींग पास न देता फ्लाईट रद्द करण्यात आल्याने प्रवाशांचे वेळ व पैशाचे मोठे नुकसान झाले आहेत. 

प्रवासी ओझर विमानतळावर ताटकळले

रविवार (ता.२७) पासून ओझर विमानतळावरून नाशिक-पुणे या एअर अलायन्स कंपनीतर्फे सेवा सुरु झाली. ओझर विमानतळावरून दुपारी २.५५ वाजता विमानाचे पुण्याकडे उड्डाण झाले. सलग तीन दिवसापासून विमान सेवा सुरळीत आहे. पुण्याकडून अद्यापही पुरेसे प्रवासी मिळतं नसल्याची अडचण आहे. दरम्यान नाशिक-पुणे विमानसेवेला मुहूर्त लागला असला तरी हैद्राबाद-नाशिक विमानसेवेला दोन दिवसांपासुन ब्रेक लागला आहे. सोमवारी (ता.२८) प्रवाशांनी बुकींग करूनही बोर्डींग पास न मिळाल्याने प्रवाशांना ओझर विमानतळावर ताटकळत राहावे लागले. ट्रुजेट तर्फे हैद्राबाद-नाशिक हवाई सेवा सुरु आहे तर नाशिक-अहमदाबाद साठी सकाळी व संध्याकाळी दोन वेळा अहमदाबासाठी उड्डाण नियमित सुरु आहे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com