लग्नात आलेल्या पाहुण्यांना वाटली सिताफळाची रोपे

विजय पगारे
शुक्रवार, 25 मे 2018

इगतपुरी : लग्नातील धुम म्हटले की डोळ्यासमोर लगेच उभे राहते. ते म्हणजे मानपान त्यामध्ये टॉवेल, टोपी, पातळ, शाल, साडी,कपडे अशा पद्धतीचा मानपान आलेल्या पाहुण्यांना द्यावा लागतो लग्नसंमारंभात अशा प्रकारच्या चालत आलेल्या अनिष्ठ रुढी-परंपरानी लग्न करणाऱ्या मालकाचे कंबरडेच मोडले जात आहे. त्यातुन एखादा चुकुन न कळत मानपान देण्याचा राहिला तर तो लगेच मानपान न मिळाल्याचा राग मनावर घेत जणु लग्नात सहभागी न होत बहिष्कारच टाकतो.

अशा प्रकारच्या अफाट खर्च न झाल्याने एवढ्या पैशामध्ये गरीब घराण्यातील मुला-मुलीचे लग्न होते. यावर उपाय म्हणुन इगतपुरी तालुक्यातील मायदरा येथील शिक्षक नामदेव भालेराव यांनी आपल्या मुलीच्या लग्नामध्ये एक वेगळा आदर्श ठेवत तसेच पर्यावरणाचे संरक्षण व्हावे यादृष्टीने मांडवासाठी आलेल्या पाहुण्यांना मानपान न देता 1 हजार 100 सिताफळ रोपे देण्यात आले.लग्नसंमारंभात एक वेगळा आदर्श ठेवल्याने तालुक्यातुन सर्वत्र कौतुक होत आहे.

यासाठी साधारणता दहा ते 11 हजार इतका खर्च लागला असुन यासाठी शिक्षक अविनाश भांड यांचे महत्वाचे सहकार्य लाभले. यावेळी जि.प.सदस्य हरिदास लोहकरे, ह.भ.प .डॉ .पंकज दूरगुडे, रत्नाकर गवारी, किरण एलम रमेश शिंदे, संदिप पवार, जालिंदर गभाले नामदेव केवारे, अॅड .भास्कर केवारे, विक्रम भांगे, निवृत्ती लोहकरे, दत्तू केवारे सह परिसरातील ग्रामस्थ उपस्थित होते.

आजकाल लग्नसंमारंभात अफाट खर्च होत असतो.आणि होणारा खर्च हा विनाकारण असतो. भालेराव सरांनी आपल्या पुतणीच्या लग्नात सिताफळाची रोपे देत एक समाजासमोर आदर्श निर्माण केला आहे. हे नक्कीच कौतुकास्पद आहे. याचा आदर्श तालुक्यातील इतरांनीही घ्यावा जेणेकरुन विनाकारण खर्चाला आळा बसेल.
- हरीदास लोहकरे जि.प.सदस्य, खेड- टाकेद गट 

Web Title: distribution of custard apple trees in marriage in igatpuri