निव्होप्रेरणा फाऊंडेशन कडुन विद्यार्थ्यांना आरोग्य किट वाटप 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 12 ऑगस्ट 2018

खामखेडा (नाशिक) :आरोग्याप्रती विद्यार्थ्यांची आस्था वाढीस लागावी व निरोगी आरोग्य त्यांना लाभावे या भावनेतून निव्होप्रेरणा फाऊंडेशन मार्फत झिरे-पिंपळ ता  देवळा शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना आरोग्य किट वाटप केले. 

आरोग्याचा मूलमंत्र म्हणजे स्वच्छ शरीर आणि स्वच्छ मन मनात आरोग्याप्रती जागरूकता निर्माण झाल्यास विद्यार्थ्यांचा शैक्षणिक उत्कर्ष साध्य होऊ शकेल असे प्रतिपादन अध्यक्ष तुषार महाजन यांनी याप्रसंगी  केले. 

 गरजू विद्यार्थ्यांना रोटरी क्लब तर्फे शालेय बूटांचे वाटप करण्यात आले.या प्रसंगी  रोटरी क्लबचे अध्यक्ष कौतिक पवार, सेक्रेटरी प्रितेश ठक्कर,देवळा डॉक्टर असोसिएशन तर्फे कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ व्ही डी आहेर, डॉ व्ही एम निकम, डॉ.स्वप्नील आहेर, डॉ क्षितिज पाटील, डॉ. निकम, रा कॉ ता अध्यक्ष पंडीत निकम, बाळासाहेब निकम , बा स संचालक निकम, दिपक निकम आदी माण्यवर उपस्थित होते. 

शाळेकडून विद्यार्थ्यांना मदत मिळावी यासाठी शिक्षिका मंदा आहेर यांनी प्रयत्न केले. 
तसेच निव्होप्रेरणा फाउंडेशन कडून विभाग व्यवस्थापक ऋषीकेश शिंदे, विभाग प्रमुख  मयूर मराठे, तुषार पाटील, तेजस कोठावदे व देवळा येथील तलाठी नितिन धोंडगे यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले. 

देवळा रोटी क्लबच्यावतीने माजी प्रांतपाल डॉ व्ही एम निकम, अध्यक्ष कौतिक पवार, सेक्रेटरी प्रितेश ठक्कर, डॉ  वसंत आहेर यावेळी देवळा रोटरीचे सद्ष्य माजी अध्यक्ष अरुण पवार, सतिश बच्छाव, सुनिल देवरे, माणिक सोनजे, राकेश शिंदे , विलास सोनजे व ग्रामस्थांच्या उपस्थितीत शालेय आवारात वृक्षारोपण करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. मुख्याध्यापिका अनुपमा देवरे, वैशाली बच्छाव यांच्या हस्ते मान्यवरांचा सत्कार केला.  देविदास शेवाळे यांनी सूत्रसंचालन केले व नितिन पवार यांनी आभार मानले.
 
Web Title: Distribution of health kit to the students from Nivhoprehana Foundation